Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना

इक्ष्वाकु कुळात जैन आणि हिंदू धर्मातील कित्येक महान पुरुषांनी जन्म घेतला. त्यांच्यापैकी एक आहेत प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम माहिती करून घ्यायचा असेल तर फक्त वाल्मिकी रामायणातूनच जाणून घ्या. प्रभू श्रीरामावर खूप काही लिहिले आणि बोलले गेले आहे. राम जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष होते म्हणूनच त्यांना 'पुरुषोत्तम' म्हटले गेले आहे. प्रभू श्रीरामाच्या जीवनाला आपण "लीला" अशासाठी म्हणतो की स्वतः प्रभू श्रीरामांनीच तशा जीवनाची रचना केली होती. म्हणूनच तर म्हणतात - प्रभू श्रीरामाची लीला - रामलीला..

http://trueeventindia.com/wp-content/uploads/2009/08/ram-chalisa.gif


रामाने १४ वर्षे वनात राहून संपूर्ण भारतभर भ्रमण करून भारतीय आदिवासी, जनजाती, पहाडी आणि समुद्री लोकांच्यात सत्य, प्रेम, मर्यादा, आणि सेवा यांचा प्रचार केला. रामाच्या या १४ वर्षांच्या वनवासाची कोणीही चर्चा करत नाही, तर ते फक्त राम - रावण युद्धाचीच चर्चा करतात. वनवासाच्या दरम्याने लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखा हिचे नाक कापले होते. सीता स्वयंवरातील आपला पराभव आणि शूर्पणखाचे नाक कापल्याचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले. वनवासाच्या दरम्यानेच रामाला सीतेपासून दोन पुत्र झाले - लव आणि कुश. एका शोधानुसार लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले जे महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढले. असो. आता आपण माहिती करून घेऊयात रामाच्या जीवनाशी निगडीत काही रहस्ये जी ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल.