भाग ४
मूळ पुस्तक येथे संपले होते. कित्येक वर्षे गेलीं. २००८ सालीं ख्रिश्चन व एस/जॉन यांच्या अखेरच्या भेटीचे जे व्हिडिओ चित्रण केले गेले होते ते
YOUTUBE वर कोणीतरी टाकले. ती व्हिडिओक्लिप अतिशय लोकप्रिय झाली व लाखों लोकांनी ती पाहिली. आजतागायत क्लिप बघणारांचा आकडा दररोज वाढतो आहे. व काही कोटींवर गेला आहे. हे क्लिप प्रकरण एस/जॉन जोडीला कळले व त्या निमित्ताने त्यानी पुस्तकाची नवीन आवृत्ति काढली तींत ख्रिश्चनबरोबरचे त्यांचे व इतर मित्रांचे अनेक फोटो व ख्रिश्चनच्या अखेरच्या भेटीचेहि फोटो दिले आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर मीहि
YOUTUBE वर ती व्हिडिओक्लिप मुद्दाम पाहिली व उतरून घेतली. ती लेखाचे शेवटी पहावयास मिळेल. त्यांत ख्रिश्चनचे लंडनमधील जीवन, मग केनियाकडे गमन व अखेरची भेट असे सर्व आहे. एका अनोख्या विषयावरील हे पुस्तक मला खूप आवडले. आपणही ते वाचावे अशी माझी शिफारस आहे.