भाग २
या दोघाना दिसत होते कीं हे काही खरे नाही. ख्रिश्चन भराभर मोठा होत होता. त्याचे बळ वाढत होते. त्याचेबरोबर खेळताना त्याना जाणवत होते कीं आता याला आवरणे कठीण होत जाणार आहे. मात्र त्यांना ख्रिश्चनचा व त्याला त्यांचा फार लळा लागला होता. ख्रिश्चनने लंडनमध्ये इतरहि अनेक लहान-मोठे मित्र-मैत्रिणी मिळवले होते! पण पुढे याचे काय करावयाचे? एकतर झू किंवा एखादी सर्कस हे त्याचे भवितव्य त्याना दिसत होते. पण झू मधील लहानशा आवारातील कायमचे बंदिस्त आयुष्य किंवा सर्कशीतील छळ-शिस्त व पिंजरा ख्रिश्चनच्या वाट्याला येऊं नये असे त्याना वाटे. पण सिंह शौक म्हणून संभाळणारा मालक कोण मिळणार हेहि कळत नव्हते. त्या प्रश्नाचे अनपेक्षित असे उत्तर पुढे आले.