वाढदिवसानिमित्त पत्र.....
आदरणीय
राजसाहेब ठाकरे...
तुम्ही मराठी मनाचे बुलंद आवाज आहात..महाराष्ट्राच्या अस्मितेचे एकमेव लढवय्ये...मराठी लोकांसाठी प्राण पणाला लावू शकता..तुमच्याशिवाय महारष्ट्रात पर्याय नाही...असे अनेक वाक्य सकाळी सकाळी माझ्या एका मित्राकडून ऐकले... मी हि एकेकाळी तुमचा समर्थक होतो...आणि तोही कट्टर... आणि याच कट्टरपणातून मी व माझे काही मित्र एकत्र येऊन डहाणूकर महाविद्यालयात मनसेची विद्यार्थी संघटनेची बांधणीही केली होती..अर्थात नंतर काही कारणांमुळे संघटना काही मजबूत झाली नाही..व नंतर मनसेच्या अनेक विचारांपासून दुरावत गेलो .. .असो..तर आज मी तुम्हाला पत्र लिहितो आहे त्याची अनेक कारणे आहेत... मी नेहमी सर्वांना सांगतो कि तुमच्यासारखं नेत्याची देशाला गरज आहे...पण असे सांगत असताना मी एक वाक्य नेहमी या वाक्याला जोडतो ते म्हणजे राज ठाकरेंनी प्रांतवाद सोडून दिलं पाहिजे... अर्थात त्यांच्या दृष्टीने प्रांतवाद एकदम बरोबर आहे..व हाच मुद्दा त्यांना सत्तेची चव चाखायला देणार आहे यात तिळमात्र शंका नाही....पण मला फक्त काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत.... आता हेच बघा ना दुसऱ्या एखाद्या प्रांतातून (स्वतःच्याच देशातल्या दुसऱ्या प्रांतात) आलेला कोणी एक माणूस हा मौजमजा करायला येत नाहीत..पोटाची भूक भागवण्यासाठी सार्वजन स्थलांतर करतात..आता तुम्ही यावर म्हणाल कि तिकडच्या नेत्यांनी त्यांची सोय करावी...तुमचं बरोबर आहे साहेब..पण तेथील स्थानिक नेते नाही करत त्यांच्या पोटातल्या भुकेची कदर म्हणून त्यांनी काय उपाशी मारावे ?... आणि ते इथे आले तर आपल्या महाराष्ट्राच्या विकासातहि भर पडतेच ना...आणि हो इथे जर ते काही बेकायदेशीर करत असतील तर नक्कीच त्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.. पण विरोधात उभे राहताना हातात काठ्या घेवून नाही तर बाजूला वकील घेवून....
तुमच्यासारख्या नेतृत्वाचे सर्व गुण असलेल्या नेत्याची फक्त महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला गरज आहे.. तुमची दूरदृष्टीमहाराष्ट्रासारख्या राज्याला आवश्यक आहे... एक प्रांतवाद सोडून तुम्ही बोला...मग बघा जे आहेत त्यांच्या दुपटीने तरुण तुमच्या मागे उभे असतील.. विकासाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरा मग बघा किती मोठा पाठींबा मिळतो ते.. उलट उत्म्ही लोकांना समजावून सांगायला हवे कि उत्तर परदेशी असो वा बिहारी हे सारे आपलेच देशबंधू आहेत... महाराष्ट्र राज्य दूरदृष्टी असलेल्या आणि सर्वसमावेशक विकासाची मागणी करणाऱ्या नेत्याच्या शोधात आहे.. आणि हे सारे गुण तुमच्यात आहेत...फक्त प्रांतवाद सोडून राजकारण करावे एवढीच इच्छा आहे...आज जेव्हा आम्ही तरुण महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे जातो एखाद्या कामासाठी तेव्हा आमच्या मनात भीती असती आमच्या जीवाची कारण आपल्या महाराष्ट्रात आपण उत्तरेकडील जनतेला जशी वागणूक देतो तशी वागणूक आपल्याला त्यांनी दिली तर ?... एक तरुण म्हणून सांगावेसे वाटलं ते सांगितल...आणी हो वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...
-नामदेव अंजना काटकर