श्री मेघनादेश्वर महादेव
श्री मेघनादेश्वर महादेवाच्या स्थापनेची कथा पुण्य कर्मांची महती आणि दोषांचे दुष्परिणाम यांच्याकडे संकेत करते. राजाचे दोष आणि दुष्कर्म यांच्यामुळेच वर्षा बाधित झाली.
पौराणिक कथांनुसार एकदा द्वापार युग आणि कलियुग यांच्या संधीवर मदांध नावाचा एक अहंकारी राजा होऊन गेला. राजा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा होता. राजाचे दोष आणि दुष्कर्म यांच्यामुळे राज्यात १२ वर्ष पाऊस पडला नाही. त्याच्यामुळे नद्या सुकून गेल्या, तलाव नाहीसे झाले, यज्ञ वगैरे सर्व बंद पडले. पृथ्वीवर सगळीकडे नुसता हाहाःकार मजला