Android app on Google Play

 

प्रकरण सहावे

 


मी चमत्कारांना सामोरे जाण्यापेक्षा बगल देणे पत्करतो. कोणाच्या श्रद्धा दुखवणे टळते ( जो माझा मुळात हेतुच नाही) व कथेचे मूळ तपासताना ते महत्वाचेहि नसते. या कथेमध्ये, कृष्णाने आलेल्या संधीचा फायदा कसा करून घेतला ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. जरासंधवध व शिशुपालवध या दोन्ही कथांत हा समान धागा मला जाणवतो.