Android app on Google Play

 

कैलास मानसरोवर (सध्याचे - चीन)

 


असे म्हटले जाते की एकदा रावणाने घोर तपश्चर्या केल्यानंतर सबंध कैलास पर्वतच उचलला होता. तो संपूर्ण पर्वतच लंकेला घेऊन जाणार होता. त्यावेळी भगवान शंकराने कैलास पर्वतावर आपला अंगठा दाबला आणि कैलास पर्वत पुन्हा होता तिथे स्थित झाला. शिवाचा परम भक्त असलेल्या रावणाचा हात पर्वताखाली अडकला, तेव्हा आपल्या लालसेसाठी रावण भगवान शंकरांची माफी मागू लागला आणि स्तुती करू लागला. तीच स्तुती पुढे जाऊन शिव तांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. कैलास मानसरोवर इथे रावणाने अनेक वर्ष तपश्चर्य केल्याचे वर्णन देखील ग्रंथांमध्ये पाहायला मिळते.