अमर आहे परशुराम
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये काही महापुरुषांची वर्णने आहेत ज्यांना आजही अमर समजले जाते. त्यांना अष्टचिरंजीवी देखील म्हटले जाते. भगवान विष्णूंचे अवतार परशुराम हे यांच्यापैकीच एक आहेत.
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन।।
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
या श्लोकानुसार अश्वत्थामा, राजा बळी, महर्षि वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, भगवान परशुराम आणि ऋषि मार्कण्डेय अमर आहेत.
असे मानले जाते की भगवान परशुराम आजही एका ठिकाणी तपश्चर्येत लीन आहेत.