Get it on Google Play
Download on the App Store

आपल्या मातेचा वध का केला होता?


एकदा परशुरामाची मत रेणुका स्नान उरकून आश्रमात परत येत होती. योगायोगाने त्याच वेळी राजा चित्ररथ देखील तिथेच जलविहार करत होता. राजाला पाहून रेणूकच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत ती आश्रमात पोचली. जमदग्नींनी तिच्याकडे पाहूनच तिच्या मनातली गोष्ट ओळखली आणि अत्यंत क्रोधीत होऊन आपल्या पुत्रांना तिचा वध करण्यास सांगितले. परंतु मातृप्रेमामुळे कोणीही त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. परशुरामाची पाळी आली तसे त्याने ताबडतोब आपल्या मातेचा वध केला. हे पाहून जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपली माता पुनर्जीवित व्हावी आणि त्यांना या गोष्टीची आठवण राहू नये असा वर मागितला. या वरदानाचे फळ म्हणून त्यांची माता पुन्हा जिवंत झाली.
आपल्या मातेची हत्या का केली होती परशुरामांनी आणि त्यांना मातृहत्येच्या पातकातून मुक्ती कशी मिळाली?
भगवान परशुराम विष्णूचे अवतार होते. त्यांच्या पित्याचे नाव जमदग्नी होते आणि मातेचे नाव रेणुका होते. परशुरामाचे ३ मोठे भाऊ होते, परंतु गुणांच्या बाबतीत परशुरामच सर्वांपेक्षा श्रेष्ठ होते. एक दिवस गंधर्वराज चित्ररथाला अप्सरांसोबत विहार करताना बघून हवन कार्यासाठी पाणी आणायला गंगा तटावर गेलेली रेणुका आसक्त झाली आणि काही वेळ तिथे थांबून राहिली. हवन कालावधी व्यतीत झाल्यामुळे क्रुद्ध मुनी जमदग्नी यांनी आपल्या पत्नीच्या आर्य मर्यादा उल्लंघन करणाऱ्या आचरणामुळे आणि मानसिक व्यभिचार करण्यामुळे शिक्षा म्हणून आपल्या पुत्रांना रेणुकाचा वध करण्याची आज्ञा दिली. परंतु मातृप्रेमामुळे कोणीही तसे केले नाही. तेव्हा ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यांची विचारशक्ती नष्ट झाली. ते अचेतन झाले.

अन्य भावांकडून असे दुस्साहस न केले गेल्यामुळे क्रोधीत पित्याचे तपोबल पाहून परशुरामाने त्यांच्या आज्ञेनुसार मातेचा शिरच्छेद केला. हे पाहून महर्षी जमदग्नी अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने ३ वर मागितले -
आई पुन्हा जिवंत व्हावी
तिला या मृत्यूची आठवण राहू नये
सर्व भाऊ पुन्हा सचेतन व्हावेत
जमदग्नींनी तीनही वर दिले. माता तर पुन्हा जिवंत झाली, परंतु मातृहत्येचे पातक मात्र परशुरामांच्या डोक्यावर चढले.


मातृकुण्डिया (मातृकुंड) – चित्तोड – राजस्थान -
राजस्थानातील चित्तोड जिल्ह्यातील मातृकुण्डिया ते ठिकाण आहे जिथे भगवान परशुराम आपल्या मातेच्या हत्येच्या पापातून मुक्त झाले. इथे त्यांनी भगवान शंकराची उपासना केली होती आणि भगवान शंकराच्या सांगण्यावरूनच मातृकुण्डियाच्या पाण्यात स्नान केल्यावर त्यांचे पाप धुतले गेले. या ठिकाणाला मेवाडचे हरिद्वार असेही म्हटले जाते. हे स्थान महर्षी जमदग्नींच्या तपोभूमीपासून साधारण ८० किलोमीटर अंतरावर आहे.

परशुराम महादेव गुफा (गुहा) मंदिर
मातृकुण्डिया पासून काही मैल अंतरावर परशुराम महादेव मंदिर वसलेले आहे. याची निर्मिती स्वतः भगवान परशुरामांनी मोठा पहाड (खडक) आपल्या परशूने कापून केली होती. या ठिकाणाला मेवाडचे अमरनाथ असे म्हटले जाते.