.....आणि धृतराष्ट्र वनात निघून गेला
युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पाण्डवांसोबत एकाच महालात राहू लागले होते. भीम नेहमीच धृतराष्ट्राशी अशा गोष्टी बोलत असे की ज्या धृतराष्ट्राला अजिबात आवडत नसत. भीमाच्या या अशा वागण्यामुळे धृतराष्ट्र फार दुःखी राहू लागला. हळू हळू तो २ दिवसांनी किंवा ४ दिवसांनी एकदा जेवण जेवू लागला. अशा प्रकारे १५ वर्ष निघून गेली. एक दिवस धृतराष्ट्राच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि तो गांधारीला घेऊन वनात निघून गेला.