Android app on Google Play

 

गांधार च्या राजकुमारीशी विवाह

 भीष्मांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाची राजकुमारी गांधारी हिच्याची करून दिला होता. विवाहापूर्वी गांधारीला ही गोष्ट माहित नव्हती की  धृतराष्ट्र आंधळा आहे. जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा तिने देखील आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली. त्यामुळे आता पती आणि पत्नी दोघेही अंध असल्याप्रमाणेच झाले होते. धृतराष्ट्र आणि गांधारीला शंभर पुत्र आणि एक कन्या होती. दुर्योधन त्यांचा सर्वात मोठा आणि सर्वात लाडका पुत्र होता. धृतराष्ट्राला दुर्योधनाच्या बाबतीत अति प्रेम वाटत असे. याच प्रेमापोटी दुर्योधनाच्या चुकीच्या कृत्यांवर देखील तो गप्प बसला. दुर्योधनाच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील तो नेहमीच तत्पर असे. हेच आंधळे प्रेम संपूर्ण वंशाच्या नाशाचे कारण बनले.