Android app on Google Play

 

धृतराष्ट्राची भीमाला मारण्याची इच्छा होती

 


भीमाने धृतराष्ट्राचे सर्वांत लाडके पुत्र दुर्योधन आणि दुःशासन यांना फाय निर्दयपणे ठार केले होते. म्हणूनच धृतराष्ट्राची भीमाला मारून टाकण्याची इच्छा होती. जेव्हा युद्ध संपले, तेव्हा श्रीकृष्णासोबत युधिष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे धृतराष्ट्राला भेटायला गेले. युधिष्ठिराने धृतराष्ट्राला प्रणाम केला, आणि सर्व पांडवांनी आपापली नावे घेऊन नमस्कार केला. श्रीकृष्णाला राजाच्या मनातली गोष्ट आधीच समजलेली होती की त्याला भीमाचा नाश करायचा आहे. धृतराष्ट्राने भीमाला आलिंगन देण्याची इच्छा दर्शवली तेव्हा श्रीकृष्णाने ताबडतोब त्याच्या जागी भीमाचा लोखंडाचा पुतळा पुढे केला. धृतराष्ट्र महाशक्तिशाली होता, त्याने क्रोधीत होऊन भीमाच्या मूर्तीला दोन्ही हातानी आवळले आणि तोडून टाकले. मूर्ती तोडल्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त देखील येऊ लागले आणि तो जमिनीवर पडला. काही वेळात त्याचा राग शांत झाला, तेव्हा त्याला वाटले की  भीम मेला आहे तेव्हा तो रडायला लागला. तेव्हा श्रीकृष्णाने महाराजांना सांगितले की  भीम जिवंत आहे, तुम्ही जी तोडलीत ती भीमाच्या आकाराची मूर्ती होती. अशा प्रकारे कृष्णाने भीमाचे प्राण वाचवले.