Get it on Google Play
Download on the App Store

दाऊद इब्राहीम



एक खुप महागडी वस्तु बॉम्बे पोर्टवर निर्यात होऊन यायची त्या वस्तुला एक नंबर दिला जायचा. दाऊदची माणस त्या नंबरला बदलून काहीतरी वेगळच करायची. नंतर त्या वस्तुला पोर्टमध्येच कुठेतरी लपवल जायचं. डिलिवर करताना ती वस्तु हरवली म्हणून सांगितल जायचं आणि अधिकारी वस्तु हरवल्याच दाखवायचे. अशा प्रकारे निर्यात करणारा इन्सुरन्स कंपनीकडून पूर्ण किंमत वसूल करायचा. त्या नंतर दाऊदची माणस निर्यात कर्त्याला त्याची वस्तु अर्ध्या किमतीत देण्याचे वचन द्यायचे. तोही तयार व्हायचा कारण त्यालाही त्याची पूर्ण किंमत मिळाली आहे. अशा पद्धतीने निर्यात करणाऱ्यांनाही फायदा आणि दाऊदला काहीही न करता अर्धे पैसे मिळायचे. अशा गोष्टी करण्यासाठी दाऊदची माणस सर्व जागेवर असायची.