Get it on Google Play
Download on the App Store

देवेंद्र सिंह उर्फ बंटी

 
बंटी ९व्या इयत्ते पर्यंत शिकला. त्याला चोरी करायची सवय होती आणि १९९३मध्ये त्याने गुन्हेगारीच्या जगात पाहिलं पाऊल ठेवलं त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडल पण तो पोलिसांच्या हातून निसटला. बंटीने संपूर्ण देशात ५०० चोऱ्या केल्या. तो पळण्यात तरबेज आहे, आणि दिल्ली, चेन्नई, चंडीगडच्या पोलिसांना फसवण्यात त्याला यश आले आहे. एक आशी गोष्ट जी बंटीला चोरी करण्यास मदत करते ती म्हणजे त्याची कुत्र्यांना आपल्या आधीन करण्याची कला, ज्यामुळे ते त्याला चोरी करताना कधीच अडवत नाहीत. बंटीची कमजोरी होती मोठ्या गाड्या आणि महागडी घडयाळ. तो महिलांमध्ये सुद्धा लोकप्रिय होता. दिवाकर बेनर्जी यांची अभय देओल अभिनित फिल्म ओय लकी लकी ओय ही बंटीच्या जीवनावर आधारित होती.