धूम्रवर्ण
एकदा भगवान ब्राम्हदेवानी सूर्यदेवाला कर्म राज्याचा स्वामी म्हणून नियुक्त केले. राजा बनताच सूर्याला गर्व झाला. त्यांना एकदा शिंक आली आणि त्या शिंकेतून एक दैत्य उत्पन्न झाला. त्याचे नाव होते अहम. तो शुक्राचार्यांकडे गेला आणि त्याने त्यांना गुरु मानलं. तो अहम चा अहंतासुर बनला. त्याने स्वतःचे राज्य निर्माण केले आणि भगवान गणेशाची उपासना करून त्यांना प्रसन्न केले आणि वरदान प्राप्त करून घेतले. त्यानेही फारच अन्याय आणि अत्याचार सुरु केले. तेव्हा गणपतीने धूम्रवर्ण या रुपात अवतार घेतला. त्याचा वर्ण धुरासारखा होता. ते विक्राळ होते. त्यंच्या हातात भयंकर असा पाश होता ज्यामधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. धुम्रवर्णाने अहंतासुराचा पराभव केला. त्याला युद्धात पराजित केले आणि आपला भक्त बनवले.