Android app on Google Play

 

गजानन

 


एकदा धनराज कुबेर हा शंकर - पार्वती यांचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोचला. तिथे पार्वतीला पाहून कुबेराच्या मनात कामवासना जागृत झाली. याच लोभातून लोभासुराचा जन्म झाला. तो शुक्राचार्यांना शरण गेला आणि त्यांच्या आदेशावरून त्याने शंकराची उपासना सुरु केली. शंकर लोभासुरावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला सर्वांपासून निर्भय होण्याचे वरदान दिले. यानंतर लोभासुराने तीनही लोकांवर कब्जा केला.एवढेच नव्हे तर खुद्द भगवान शिवालाही त्याच्यामुळे कैलास पर्वत सोडवा लागला. तेव्हा देवांच्या गुरुंनी सर्व देवांना गणेशाची उपासना करायचा सल्ला दिला. त्या उपासनेने प्रसन्न होऊन गणपतीने गजानन अवतारात दर्शन दिले आणि सर्व देवांना वरदान दिले की मी लोभासुराचा पराजय करेन. गजाननाने लोभासुराला युद्धासाठी निमंत्रण दिले. शुक्राचार्यांच्या सल्ल्यावरून लोभासुराने युद्ध न करताच आपला पराभव मान्य केला.