Android app on Google Play

 

श्री चिंतामणी

 


अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे चिंतामणी. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली इथे आहे. मंदिराच्या शेजारीच तीन नद्यांचा संगम आहे. या तीन नद्या आहेत भीमा, मुळा आणि मुठा. जर एखाद्या भक्ताचे मन अस्वस्थ असेल, चित्त विचलित असेल आणि आयुष्यात त्याला सारखा दुःखाचा सामना करावा लागत असेल, तर या मंदिरात आल्यावर सर्व समस्या निघून जातात. असं म्हटलं जातं की स्वतः भगवान ब्रम्हदेवाने स्वतःचे विचलित मन काबूत आणण्यासाठी याच स्थानावर तपश्चर्या केली होती.