श्री वरदविनायक
अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजे वरदविनायक. हे मंदिर महाराष्ट्रातील महाड इथे वसलेले आहे. महाड म्हणजे एक सुंदर डोंगराळ गाव. इथे असं मानलं जातं की वरदविनायक नवसाला पावतो म्हणजेच भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा वर देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा एक दिवा आहे जो कित्येक वर्षांपासून तेवता ठेवलेला आहे. वारादाविनायाकाचे केवळ नामस्मरण केले तरी सर्व मनोकामना पूर्ण होतात.