Get it on Google Play
Download on the App Store

श्री बल्लाळेश्वर मंदिर


अष्टविनायकातील पुढचे मंदिर आहे बल्लाळेश्वर मंदिर. हे मंदिर पाली जिल्हा रायगड या गावी आहे. मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरून खोपोली मार्गे इथे जाता येते तर मुंबई - गोवा महामार्गावरून नागोठणे वाकण इथून या मंदिराकडे जाण्यासाठी फाटा आहे. या मंदिराचे नाव गणपतीचा भक्त बल्लाळ याच्या नावावरून पडले आहे. पूर्वीच्या काळी बल्लाळ नावाचा एक मुलगा होता, तो गणपतीचा निस्सीम भक्त होता. एक दिवस त्याने पाली गावात विशेष पूजेचे आयोजन केले. पूजा कित्येक दिवस चालूच होती, पूजेला बसलेली अनेक मुलं घरी न जाता तिथेच बसून राहिली. यावरून चिडून त्या मुलांच्या पालकांनी बल्लाळ याला मारहाण केली आणि गणपतीच्या मुर्तीसकट त्याला जंगलात फेकून दिलं. अतिशय गंभीर अवस्था असताना बल्लाळ गणपतीच्या मंत्रांचा जप करत होता. या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणेशानी त्याला दर्शन दिले. त्या वेळी बल्लाळने गणपतीला आग्रह केला की त्यांनी आता याच स्थानी वास्तव्य करावे. गणपतीने त्याचा आग्रह मोडला नाही.