उंबरठा - स्मिता पाटीलची सुलभ महाजन
स्मित पाटील चा अकाली मृत्यू झाला नसता तर ह्या नायिकेने भारतीय चित्रपट सृष्टीच्या कक्षा आणखीन रुंदावल्या असत्या ह्यांत शंका नाही. तिच्या छोट्याश्या कारकिर्दीत तिने अनेक अविस्मरणीय भूमिका आमच्या मनावर कोरल्या. सुलभ महाजन हि उंबरठा चित्रपटाची नायिका आहे. एक पुरोगामी कुटुंबात तिचे लग्न झाले आहे आणि ती स्त्रीयांच्या हक्क साठी काही तरी करू इच्छित आहे. ती एका स्त्री सुधार ग्रहाची प्रमुख म्हणून नोकरी स्वीकारते. पण गांजलेल्या स्त्रियांची मदत करता करता तिचा स्वतःचा संसार उध्वस्त होतो.
एका स्वावलंबी स्त्रीला काय काय सहन करावे लागते आणि पुरोगामी म्हणवून गेह्णारे लोक कसे प्रत्यक्षांत दुटप्पी असतात ह्याचे दर्शन स्मिताने अतिशय छानपणे आम्हाला घडवले.