Android app on Google Play

 

नजर जरा स्वच्छ करून घराबाहेर पड !!

 

'आता पुन्हा एकदा आई- वडील,मुलींना सांगतील, भाऊ... बहिणींना बजावतील,नवरे... बायकांना ठणकावतील , मित्र... मैत्रिणींना सुनावतील , 'सातच्या आत घरात या... अंगभर कपडे पांघरा..' नजर खाली ठणकावतील... मित्र... मैत्रिणींना सुनावतील... सातच्या आत घरात या... अंगभर कपडे पांघरा... नजर खाली ठेवा... जमलं तर बुरखेच घाला...

निसर्गाने तुम्हाला जे शरीर दिलेय तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. तुमच्यावर अतिप्रसंग झाला तर ती तुमची चूक आहे. पुरुषाला निसर्गाने तसाच बनवलाय. त्यात त्यांची काहीच चूक नसते. तुम्हीच स्वत:ला सांभाळून राहायला हवं.... पुरती कवटीला भेग जाईल असं वाटतयं...

इतकं ज्ञान स्त्रियांना शिकवण्यापेक्षा पोरांना का नाही खडसावत ? की तुझी आई , बहीण , मैत्रीण , बायको , मुलगी किंवा रस्त्यावरून चालणारी कुठलीही स्त्री कशीही असली तरी तुझ्या बापाची इस्टेट नाहीये... तुझी नजर जरा स्वच्छ करून घराबाहेर पड आणि तुझी पुरुष असल्याची गुर्मी तुझ्याचजवळ ठेव !!

-प्रबोधन टीम