Get it on Google Play
Download on the App Store

नशिबात असेल तेच मिळते असे असेल तर...!!

एखाद्या झाडाला पळत-पळत जाऊन टक्कर द्या भलीमोठी...नशिबात असेल तर ...लागेल नसेल तर नाही लागणार..

आजारी पडले तर असेच म्हणावे मग "जाउ दया ,आजारी पडणे हेच आपल्या नशिबात होते आणि आता नशिबात असेल तर आपण आपोआप बरे होऊ"

आपल्या घरातील कप आणि बश्यावर नशिबाचा प्रयोग सिद्ध होईल... डोक्यावरून फेका नशिबात असेल तर फुटेल नाहीतर सुरक्षित राहतील...

मान्य आहे काय ?

नशीब मान्य असेल तर करून बघा...

नाहीतर नशीब नावाचे थोतांड मनातून फेकून द्या...

प्रयत्नवादी जीवन जगून,प्रयत्नाला बुद्धीची,विवेकाची,कल्पकतेची (Imagination) जोड द्या आणि यशाच्या उच्च शिखरावर विराजमान व्हा ! यश तुमची वाट पाहत आहे..!

प्रयत्नवाद जिंदाबाद...

लेखं - सुनील चौधरी (जळगाव )