Get it on Google Play
Download on the App Store

स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्तिदाते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

समाजातील बऱ्याच स्त्रियांना फुले आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं याची मुळीच जाण नाही, हि खेदाची बाब आहे, माता भगिनींनो या गुरु-शिष्याने तुमच्यासाठी केलेले कार्य हे तुम्ही कधीच विसरून चालणार नाही, कारण मी खाली अशी काही मुद्दे आपल्या समोर मांडत आहे ते वाचून तरी तुम्ही ह्या दगडधोंड्यांचा नाद सोडून या दोन महामानवाने तुमच्यासाठी काय केले याची जान ठेवलं.

भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे.

स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य तथागत बुध्द, क्रांतीज्योती फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.

प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल.
१. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.
महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम २९ नुसार प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार बहाल केला.
२. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला.
३. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार पतीला पत्नी ची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २३(१) नुसार स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई केली आहे.
४. मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २५ नुसार धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे.
५. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार स्त्रीला नवर्या पासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवर्यासोबतच राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ६ अनुसूची ३ (झ) नुसार नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.
६. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार पत्नीलला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ३०० (क) नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही. तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार स्त्रिला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्यात आला आहे.
७. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, तुलशीदास यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, ‘ढोल गवॉर शुद्र पशु नारी, सब ताडन के आधिकारी।’
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार स्त्रिला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रिला त्रास होवू नये म्हणून इंडियन माईन्स ऎक्ट १९४६ ची निर्मिती करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली. तसेच माईन्स मॅटर्निटी बेनेफिट ऎक्ट तयार करुन स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस केली. पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला. त्याच प्रमाणे घटनेच्या कलम ४२ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.
८. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार कुटुंबातील कोणत्याही स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३९ (क) नुसार उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार दिला. तसेच घटनेच्या कलम ३२५ नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर करुन .बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.
९. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार स्त्रियांची मानहानी करणे व कलम १४ नुसार लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या कलम ३९ (क) नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.
१०. विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणार्या कुप्रथा स्त्रियांवर हिंदूधर्माने लादल्या.

बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ५१ (ड) नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.

हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले. म्हणूनच महात्मा फुल्यांनी, ‘मनुस्मृती जाळली पाहिजे’ असे जळजळीत उद्गा र काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला. ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पन करुन तिची अंमलबजावनी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.

आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणार्यान या महामानवा समोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायला पाहिजे.

लेखं - निलेश यशवंत ठेंगे. (नाशिक)