Get it on Google Play
Download on the App Store

दारू !!

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.

आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.

खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक ''मव्हाचे'' झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ''दारू'' बनवली.

आणि म्हणूनच....

ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो.

थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नही, मीच मोठा मोठा आसे तो करतो.

सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.

आपण आता पर्यंत कोण कोण झाला आहात ?

- प्रबोधन टीम (संग्रहित लेखं)