Android app on Google Play

 

आपला मित्र किती शब्दांत ओळखाल ?

समजा आपल्या एका जुन्या मित्राने अनेक वर्षां नंतर आपल्याला फोन केला तर त्याला ओळखण्यासाठी तुम्हाला किमान किती शब्द ऐकावे लागतील ?

२. मोन्तरियल विद्यापीठातील संशोधकांनी ह्यावर रिसर्च करून २ हे उत्तर शोधले आहे. फ्रेंच भाषिक लोकांवर प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अनेक ध्वनीमुद्रित संभाषणे ऐकवली त्यात काही ओळखीच्या लोकांची होती तर बहुतेक अनोळखी लोकांची संभाषणे होती. बहुतेक लोकांनी फक्त दोन शब्द ऐकून आपले मित्र ओळखले.