Get it on Google Play
Download on the App Store

अंधार

मित्रांनो ही एक सत्य घटने वरती आधारित कथा आहे

ही कथा आहे कळंदी नागपूर जवळील गावातील पिंट्या पांडेची शाळेत कधीच न गेलेला मुलगा. त्या सोबत घडलेली ही खरी घटना आहे.पिंट्या त्याच्या आजोबासोबत राहत होता घरात फक्त त्याचे आजोबा आणि तो त्याच्या आजोबांकडे 3 एकर जमीन होती. दोघेही शेतात एकसाथ मजुरी करत होते. एकदा सकाळी पिंट्या आजोबास घेऊन तालुक्यास गेला होता. आणि ते रात्री शेवटच्या बसने गावात परतले. गावात तेव्हा रस्त्यावरती दिवे कमीत कमी होते. अंधारातून वाट काढत ते दोघे जात होते. पण तेवढ्यात आजोबा थांबले. आणि एक टक समोरील चिंचेच्या झाडाकडे पाहू लागले. त्यांना काहीतरी दिसले हे मात्र नक्की होते. पिंट्या ने विचारले काय आहे आजोबा तिकडे. पण आजोबांनी पिंट्यास काही सांगितले नाही आणि ते सरळ पिंट्यास घेऊन घरी घाईघाईत आले.. आजोबांनी काहीच संगितले नाही पिंट्या आणि आजोबा झोपी गेले. दुसर्‍या दिवशी पिंट्या आपल्या मित्रासोबत कामास निघाला आणि परत घरी येताच तो पार चकरावला. कारण त्याच्या आजोबांनी गळफास घेतला होता. पिंट्याचा आधार देवाने त्याच्याकडून हिरकावून घेतला होता... पिंट्या खूप दुखी झाला होता. त्याने अतोनात विचार केला की का आजोबांनी आत्महत्या केली असावी अशी काय परेशानी झाली त्यांना की त्यांना एवढा मोठा पाय उचलावा लागला... ... पिंट्या रडून रडून हिरमुसला गेला होता... त्याला आई वडील देखील नव्हते ते देखील वारले होते...त्याला त्याच्या आजोबांनीच लहानचे मोठे केले होते... आपल्या नशिबाला दोष देत पिंट्या घरातून बाहेर पडला... त्याच मन आता फक्त दारूकडे वळू लागले होते.... तो काही दिवस दारू ढोसून रडत बसायचा... पण नंतर काही..दिवसांनी तो कामास परत लागला...पण रात्री तो दारू पिऊन घरी परतू लागला वाटेत त्याला तेच चिंचेचे झाड दिसले,... तो तेथून तसाच जाऊ लागला.. की त्या अंधारातून त्यास कोणीतरी हाका मारू लागले..... एवढ्या अंधारात आपल्याला कोणीतरी हाक मारताय हे पाहून पिंट्या बघण्यासाठी पुढे सरसावला... तेथे दिव्याचा एक खांबावरील दिवा बंद चालू बंद चालू होत होता..त्यातच पिंट्या पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला जे दिसले ते पाहून पिंत्याची पूर्णपणे दारू उतरली....पूर्ण पणे नग्न असलेला एक माणूस तेथे झाडाखाली बसला होता पूर्ण अंग पांढरे राखडलेले... त्याचे तोंड पूर्ण पणे रक्ताने भरलेलं होत... त्याच्या पुढ्यात एक कुत्रे मेलेले पडले होते तो माणूस त्या कुत्र्याचे लचके तोडत तोडत पिंट्या कडे पाहत हसत होता.. पिंट्यास काही समजेना झाले होते.. तो त्या माणसाकडे एकटक बघत उभा होता... त्याला काही कळेनसे झाले होते.. असे वाटत होते की एकवेळ मला झटका येऊन मी बेशुद्ध व्हावे.. की हा समोरून नाहीसा व्हावा अथवा याने एकदाचा आपला जीव घ्यावा... पण ती भीती काशी तरी जावी हीच प्रार्थणा पिंट्या देवाकडे करत होता... पण कसे बसे उरले सुरले आवसान घेऊन पिंट्या जोरात ओरडला आणि ओरडत ओरडत पळत सुटला... आणि थेट घेरी आला..तो गावात आला आणि भीतीने ओरडू ओरडू त्याने गावकर्‍यांना संगितले.... गावकरी त्याचे बोलणे ऐकून बिथरले... काही धीट लोक त्याच्या सोबत गेले हातात काठी लाठ्या घेऊन... ते सर्व गेले तेथे एका कुत्र्याचा मृतदेह अर्धांग दिसले गाववाले थोडे समजून चुकले की इथे काही तरी झालय... पण ते सर्व परत आले... सकाळी पिंट्या भीत भीतच कामावर् गेला... तेव्हा त्याचे शेतात.. एका आंब्याच्या झाडाखाली त्याला एक माणूस गांजा पित बसलेला दिसला.. जेव्हा पिंट्या त्या माणसाकडे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तोच माणूस होता ज्याला तिने रात्री पाहिले होते कुत्र्यास खाताना.. पण या वेळी तो साध्या वेशात होता आणि लुंगी गुंडाळून चिलम पित होता... पिंट्याने भित भीत बाजूचा मोठा दगड उचलला.. तेवढ्यात तो माणूस त्याला म्हणाला "ऐसी गलती करने की सोचना भी मत वरना कयामत आ जायेगी " पिंट्या थांबला आणि दगड हातात ठेवूनच बोलला... "भोसडीच्या कोण आहेस तू साल्या रात्री कुत्रं खात होतास ना मी तुला आज चांगलाच धडा शिकवतो" तेवढ्यात तो माणूस म्हणाला तेरा दादा तुझसे बहोत प्यार करता है पिंट्या मेरा नाम कालबाबा .. .. बस उसिने मुझे भेजा है मेरी बात समझ मै यहा तुझे आने वाली मुसीबत से बचाने आया हू.." पिंट्या पूर्ण गोंधळून जाऊ लागला होता... पिंट्या ने त्यास गालिच्छ भाषेत शिव्या घातल्या.... त्याच्या बोलण्याने तो बाबा निघून गेला...आणि पिंट्या वैतागून कामास लागला.. त्या घडलेल्या घटनेने त्याने पुन्हा पिण्यास सुरुवात केली... असाच एकदा पिंट्या दारू ढोसून.. घरी जात होता जाता जाता त्याला असे वाटू लागले की आपल्या डोक्यावरी कसला तरी पक्षी उडत आहे

त्याने वरती पाहिले तर पांढरीशुभ्र साडी आणि तिचा पदर फड फड आवाज करत होता.. ती साडी वारा वागेरे काही नसताना हवेत तरंगत होती.. काही क्षणातच ती त्याच्या समोर येऊन पडली... पिंट्या नशेत असल्याने त्याने ते दुर्लक्ष केले.. आणि घरी गेला दुसर्‍या दिवशी पण तसेच झाले रोज रोज त्याच्या समोर ती रस्त्यात साडी उडत येऊन पडू लागली.. एकदा तो घरी आला त्याला घरात काहीतरी असल्याची चाहूल लागली... त्याने पूर्ण घर पाहिले पण घरात कोणीच नव्हते... तो घरात आला आणि झोपला पण त्याला अचानक दरवाजा धाड करून तुटण्याचा आवाज आला... तो सावध होऊन बाहेर आला पण बाहेर काहीच नव्हते.. आणि दरवाजा जसच्या तसा होता.. दरवाज्या समोर एक स्त्री होती जी पिंट्या कडे पाहत रडत होती.... आणि पिंटू फार घाबरला ,.., त्याला काही कळेना त्याने दारातूनच आवाज दिला कोण आहे तिकडे की समोरून त्यास एक आवाज आला तुझ मरण ...पिंट्या पुढचा शब्द बाहेर काढणार तेवढ्यात त्याच्या मानेवरती कसला तरी धारदार सुळयांचा वार जाणवला तो त्या वेदनेने विव्हळला.... त्याच्या बाजूला एक प्रेत उभे होते जे त्याच्या मानेत आपले सुळे खुपसून त्याने रक्त पित होते... की तेवढ्यात दारात कालबाबा आला.. आणि त्याने जवळील अंगारा त्या प्रेताच्या अंगावरती फेकला... की ते प्रेत दूर फेकले गेले... तरी ही त्या प्रेताने पिंट्या वरती दूसरा वार केला... तेवढ्यात कालबाबा ही काही करू शकला नाही... ते प्रेत पिंट्याचे रक्त पिऊ लागले.... की कालबाबाने पिंट्याकडे एक तलवार घरंघळत फेकून दिली... आणि ओरडून त्यास सांगू लागला .. पिंट्या ले तेरे भगवान का नाम और कर इज शैतानी रूह के दो टुकडे ते प्रेत .. पिंट्याचा जीव घेतच होत की.. पिंट्याने भवानी मातेच नाव घेतले आणि उरल्या अवसानने ती तलवार प्रेताच्या शरीरावरून फिरवली.... की तिचे क्ष्ंनार्धात दोन टुकडे झाले...आणि भयानक किंचाळी करत ते प्रेत नाहीसे झाले पण पिंट्याची मान देखील कापली गेली होती.. त्या प्रेतामुळे... त्याच्या चावामुळे तेव्हा कालबाबा पुढे आला आणि त्यास बोलू लागला "मुझे माफ करदेना पिंटू मे तुझे बचा नाही सका " वो रूह एक वैषया की थी जिसका तेरा बाप दीवाना था उसने पैसे की वजह से तेरे बाप को पुरे गाव के सामने बदनाम किया उसीका बदला लेणे तेरे बापने उसे जिंदा जमीन मे गाड दिया था . और उसिने तेरे मा बाप को फिर ..आत्मा बनकर मार डाला.. तेरे दादाजी तुझे वहासे यहा इस गाव लाये तकि तू उससे बचा रह... लेकीन वो आत्मा यहा पार आ ही गयी उसे तूम सबकी मौत से ही मुक्ति मिल सक्ती थी... जाब एकदिन तू और तेरे दादा बाहर से गाव मे आ रहे थे तभी तेरे दादा ने उसे पेड पे देखलीया था लेकीन उसने तू घर मे नही था तब उसने तेरे दादा को मार डाला उससे पेहले तेरे दादाने मुझसे मदद मांगी थी.,,, मै तो सिर्फ एक तांत्रिक अघोरी हू... मै ना तुझे बचा सका ना तेरे दादा को...मै तेरा गुन्हेगार हू बच्चे... पिंट्या रडत रडत त्या कालबाबा चे आभार मानू लागला... आणि हसत हसत त्याने प्राण सोडून दिला...