Android app on Google Play

 

यक्ष

 

हा प्रसंग लहान आहे. पण माझ्यासाठी जीवनातला अतिशय अविस्मरणीय प्रसंग आहे. माझ्या पणजीच्या बाराव्याची गोष्ट आहे. मी आणि माझ्या आईकडचे सगळे नातेवाईक कोकणच्या संगमेश्वर गावी गेलो होतो. मी तेव्हा पाचवीला होतो. माझ्यासोबत तेव्हा माझ्यापेक्षा एक वर्ष मोठा माझा मावस भाऊ होता. तो नेहमी मला घाबरवत असे.

आजीचे सगळे विधी उरकले होते. आम्ही मुंबईला निघणारच होतो. आजीचं घर जुन्या मांडणीच होतं. स्वयपाक घरामध्ये मागे एक दरवाजा होता, जो थेट घराच्या मागच्या बाजूला उघडत असे. तिथे बरीच झाडी होती. थोडेसे जंगलंच म्हणा!

मी आणि माझा भाऊ शू साठी तिथे गेलो. रात्रीचे साधारण साडेनऊ दहा झाले होते. माझा भाऊ माझ्या खोड्या काढत मला घाबरवत होता. आम्हाला झाडावर काहीतरी उद्या दिसले. ते जंगल होते. साहजिकपणे मला वाटले कि कोणी माकड असेल. दादाने दगडी उचलल्या, आणि मारायला लागला.

इतक्यात त्याच्यासमोर चारपाच फूट उंच एक काळाकभिन्न खाडी उडी मारून येउन उभा ठाकला. त्याचं रूप अतिशय भयानक होतं. काळाकुट्ट, बुटका, अतिशय कुरुप. डोळे वेगळ्या रंगाचे होते. आणि विवस्त्र होत. मी त्याला कधीही विसरू शकणार नाही. तो एकदमच समोर आला होता. आम्हाला पाळता भुई थोडी झाली. माझा भौतर मला मागे खेचून टाकून पळाला. आम्ही कसेबसे घरात पोचलो. दार आतून लाऊन घेतले. आम्हाला आधीच सांगितले होते, कि मागच्या बजुला जाऊ नका. तरीही आम्ही गेलो होतो.

आम्ही मोठ्यांचा ओरडा बसू नये, म्हणून शांत बसून राहिलो. कोणाला काहीच सांगितले नाही. पण ते समजल्याशिवाय राहिलेही नाही. त्याच रात्री आम्ही खूप आजारी पडलो. आम्ही घाबरलो आहोत हे सर्वांच्या लक्षात आलं. सर्वांनी खोडून खोडून विचारलं. आम्हाला खरं बोलावं लागलं.

तेव्हा आम्हाला असं सांगितलं, कि तो तिथल्या जागेचा यक्ष होता. रक्षक देवतेला जुने लोक जागेवाला म्हणत असत. त्याच्या जागी शु केली आणि दगडं मारली म्हणून तिने आम्हाला घाबरवलं. तो जागेवाला रागावला होता. असो… पुन्हा असं नाही झालं . खोटं वाटू शकतं… पण जे झालं ते असं झालं. . . . असो…"

*****************************

तो यक्ष असावा. यक्ष हा एखादा पाणवठा, जंगल, किवा डोंगरी अशा वेगवेगळ्या भौगोलिक पर्यावासाशी बांधली गेलेली देवताच असते. यक्षाकडे त्या जागेचे अधिकार असतात. तिथे त्याचा वावर असतो. ते क्रूर नसतात.

आणि सहसा कोणाला कधी इजाही नाही ह्या यक्षांना देवता म्हणता येण्याइतपत ते शक्तिशाली असतात कि नाही, हे माहित नाही; पण यक्ष शापित देवता असतात असे आमची आजी आम्हाला सांगत असे. ह्या गोष्टी ऐकायला आजही तेवढीच उत्सुकता जाणवते.