Get it on Google Play
Download on the App Store

कोल्हा आणि लांडगा

एके दिवशी काही प्राणी एका सुंदर तरूण कोल्ह्याला सिंहाच्या आज्ञेने धरून ठार मारण्यासाठी घेऊन चालले असता एका लांडग्याला त्या कोल्ह्याची दया आली. त्याने सिंहाजवळ रदबदली करून कोल्ह्याचा प्राण वाचविण्याचा निश्चय केला. मग तो त्या प्राण्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला, 'अधिकारीहो, या कोल्ह्यानं असा कोणता अपराध केला आहे?' प्राण्यांपैकी एकाने सांगितले, 'ह्या कोल्ह्याने बर्‍याच कोंबड्या मारून खाल्ल्या अन् हा इतका उद्धट आहे की, खुद्द सिंह महाराजांनी स्वतःसाठी राखून ठेवलेला एक लठ्ठ कोंबडाही याने मारून खाल्ला !' हे ऐकून कोल्ह्याला लांडगा म्हणाला, 'हा तुझा अपराध फारच मोठा आहे नि या बाबतीत मी जरी काही रदबदली केली तरी तिचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही.' इतके बोलून लांडगा आपल्या वाटेने निघून गेला.

इसापनीती कथा ३०१ ते ३५०

इसाप
Chapters
कोळी व माकड कोल्हा व सिंह कोल्हा आणि बोका किडा आणि त्याचे पोर गाढव व त्याचा मालक बोकड आणि फुलझाड जेवायला गेलेला बोका भिकारी आणि त्याचा कुत्रा बकरे, मेंढे आणि लांडगे आंधळा व लांडग्याचे पोर आजारी सिंह आणि कोल्हा गरुड पक्षीण, मांजर व डुक्करी बोकड आणि बैल शेतकरी आणि कोल्हा जाळ्यात सापडलेला रेशमाचा किडा मुलगा आणि पोपट तरुण पुरुष आणि कोकीळ ससा आणि शिंगे इसाप व कोंबडी सरडा माशा, मधमाशा व गांधिलमाशी लढाऊ कोंबडे व बदके वाघ आणि कुत्रा कोल्हा व कोंबडा मधमाशी आणि कोकिळा गरुड, डोमकावळा आणि घार गरुडाचे सौंदर्य सिंह, गाढव व ससे दोन कोल्हे माणूस व गाढव उंदीर आणि मांजर पोपट आणि पिंजरा कंजूस माणूस व पोपट मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा म्हातारा आणि पोपट दोन प्रवासी आणि गाढव नाचणारी माकडे आंधळी मेंढी कुत्रा आणि मांजर कोल्हा आणि लांडगा डौली घुबड अस्वल व कोंबड्या कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा गरुड आणि ससा मासे व कोळी मधमाशी व कोळी बेडूक व मधमाशी रोगाची साथ आणि प्राण्यांची सभा एक पोपट व त्याचा पिंजरा भुंगा व चिमणी