जाळ्यात सापडलेला रेशमाचा किडा
एका पारध्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे पसरून ठेवले होते, त्यात एक रेशमाचा किडा सापडला. ज्या जाळ्यात आपण सापडलो ते जाळे रेशमाचे आहे हे पाहून तो किडा मनाशीच म्हणाला, 'हे जाळे विणायला जे रेशीम लागले, त्याचा पुरवठा माझ्याकडूनच झाला आहे; याबद्दल मला जितकं वाईट वाटतं तितकं मरणाबद्दलही वाईट वाटत नाही.'
तात्पर्य
- आपल्यावर ओढवलेले संकट आपल्याच चुकीमुळे ओढवले आहे, असे जेव्हा एखाद्याला समजते, तेव्हा त्याला फार वाईट वाटावे हे साहजिकच आहे.