प्रकरण एक ते बारा 73
निर्वाणमार्गातील श्रावकांचे चार भेद
निर्वाणामार्गात श्रावकांचे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा असे चार भेद असत. सक्काय दिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ याजविषयी शंका किंवा अविश्वास), सीलब्बतपरामास (स्तानादिक व्रतांनी आणि पोषमानी मुक्ति मिळेल असा विश्वास) या तीन संयोजनचा (बंधनाचा) नाश केला असता श्रावक सोतापन्न होतो, आणि त्या मार्गात तो स्थिर झाला म्हणजे त्याला सोतापत्तिफलट्ठो+ म्हणतात. त्यानंतर कामराग (कामवासना), आणि पटिघ (क्रोध), ही दोन संयोजने शिथिल होऊन अज्ञान कमी झाले म्हणजे तो सकदागामी होतो, आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर त्याला सकदागमिफलट्ठो म्हणतात. या पाचही संयोजनाचा पूर्णपणे क्षय केल्यावर श्रावक अनागामी होतो आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर त्याला अनागामिफलट्ठो म्हणतात. त्यानंतर रूपराग (ब्रह्मलोकादिप्राप्तीची इच्छा), अरुपराग (अरुप देवलोक प्राप्तीची इच्छा), मान अहंकार), उद्धच्च (भ्रान्तचित्तता), आणि अविज्जा (अविद्या), या पाच संयोजनाचा क्षय करून तो अरहा (अर्हन) होतो, आणि त्या मार्गात स्थिर झाला म्हणजे त्याला अर्हप्फसट्ठो (अहंल्फलस्थ) म्हणतात. याप्रमाणे श्रावकांचे चार किंवा आठ भेद करण्यात येतात.
चित्र आणि विशाख हे गृहस्थ असून अनागामी होते आणि आनंद भिक्षु असता बुद्ध भगवंताच्या हयातीत केवळ सीतापन्न होता. क्षेमा, उत्पलवर्णा वगैरे भिक्षुणी अर्हतपदाला पावल्या होत्या. म्हणजे निर्वाणामार्गात प्रगति करण्याला स्त्रीत्व किंवा गृहस्थत्व मुळीच आड येत नसे.
संघाची प्रतिष्ठा
बुद्ध सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि।
संघं सरणं गच्छामि।
ह्याला शरणागमन म्हणतात. आजला देखील बौद्ध जनता हे त्रिशरण म्हणत असते. ही वहिवाट बुद्धाच्या हयातीतच सुरू झाली असावी. आपल्या धर्माइतकेच महत्त्व बुद्ध भगवंताने संघाला देऊन ठेवले हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. कोणत्याही दुसर्या धर्मात हा प्रकार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, “कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या. म्हणजे मी तुम्हाला विश्रांति देईन.”
आणि कृष्ण भगवान म्हणतो,
सर्वधर्मान्परित्यज्य मानेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षविष्यमि मा सूच।।
‘सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण जा, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस.’
पण बुद्ध भगवान म्हणतो, “तुम्ही युद्ध, धर्म आणि संघ यांचा आश्रय धरून स्वत:च्या परिश्रमाने आपल्या आणि इतरांच्या दु:खाचा नाश करा; जगाचे दु:ख कमी करा.”
जगातील सुज्ञ आणि शीलवान स्त्रीपुरुषांचा मोठा संघ बनवून याला जर आपण शरण गेलो, तर दु:खविनाशाचा मार्ग सुगम होणार नाही काय?