Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एक ते बारा 11

८. वंसा (वत्सा)

याची राजधानी कोसम्बी (कौशाम्बी). बुद्धसमकाली येथील गणसत्ताक राज्यपद्धति नष्ट झाली व उदयन नावाचा मोठा चैनी राजा सर्वसत्ताधिकारी झाला, असे दिसते. धम्मपद अट्टकथेत या राजाची एक गोष्ट आली आहे, ती अशी:-

उदयनाचे आणि उज्जयिनीचा राजा चंडप्रद्योत याचे अत्यंत वैर होते. लढाई उदयनाला जिंकणे शक्य नसल्यामुळे प्रद्योताला काही तरी युक्ति लढवून उदयनास धरण्याचा बेत करावा लागला; उदयन राजा हत्ती पकडण्याचा मंत्र जाणत होता; आणि जंगलात हत्ती आल्याबरोबर शिकारी लोकांना घेऊन तो त्याच्यामागे लागत असे. चंडप्रद्योताने एक कृत्रिम हत्ती तयार करविला व त्याला वत्सांच्या सरहद्दीवर नेऊन ठेवण्यास लावले. आपल्या सरहद्दीवर नवीन हत्ती आल्याची बातमी समजल्याबरोबर उदयन राजा त्याच्या मागे लागला. या कृत्रिम हत्तीच्या आत दडून राहिलेल्या मनुष्यांनी तो हत्ती चंडप्रद्योताच्या हद्दीत नेला. उदयन त्याच्या मागोमाग पळत गेला असता तेथे दबा धरून राहिलेल्या प्रद्योताच्या शिपायांनी त्याला पकडून उज्जयिनीला नेले.

चंडप्रद्योत त्याला म्हणाला, `हत्तीचा मंत्र शिकवशील तर मी तुला सोडून देईन, नाही तर येथेच ठार करीन.’ उदयन त्याच्या लालचीला किंवा शिक्षेला मुळीच घाबरला नाही. तो म्हणाला, `मला नमस्कार करून शिष्य या नात्याने मंत्राध्ययन करशील तरच मी तुला मंत्र शिकवीन;   नाही तर तुला जे करावयाचे असेल ते कर.’ प्रद्योत अत्यंत अभिमानी असल्यामुळे त्याला हे रुचले नाही. पण उदयनाला मारून मंत्र नष्ट करणेही योग्य नव्हते. म्हणून तो उदयनाला म्हणाला. `दुसर्‍या एखाद्या माणसाला तू हा मंत्र शिकविलास, तर मी तुला बंधमुक्त करीन.’

उदयन म्हणाला, `जी स्त्री किंवा जो पुरुष मला नमस्कार करून शिष्यत्वाने मंत्राध्ययन करील, तिला किंवा त्याला मी ती शिकवीन.’

चंडप्रद्योताची कन्या वासुलदत्ता (वासवदत्ता) मोठी हुशार होती. मंत्र ग्रहण करण्याला ती समर्थ होती खरी; पण उदयनाला आणि तिला एकत्र येऊ देणे प्रद्योताला योग्य वाटले नाही. तो उदयनाला म्हणाला, `माझ्या घरी एक कुबडी दासी आहे, ती पडद्याच्या आड राहून तुला नमस्कार करील आणि तुझे शिष्यत्व पत्करून मंत्र शिकेन. तिला जर मंत्रसिद्धि मिळाली, तर तुला मी बंधमुक्त करून तुझ्या राज्यांत पाठवीन.’

उदयनाने ही गोष्ट कबूल केली. प्रद्योताने वासवदत्तेला सांगितले की, `एक श्वेतकुष्ठी मनुष्य हत्तीचा मंत्र जाणतो. त्याचे तोंड न पाहता त्याला नमस्कार करून तो मंत्र ग्रहण केला पाहिजे.’ त्याचप्रमाणे वासवदत्तेने उदयनाला पडद्याआड नमस्कार करून मंत्र शिकण्यास सुरुवात केली. तो शिकत असता काही अक्षरे तिला नीट उच्चारता येईनात. तेव्हा उदयन रागावून म्हणाला, `हे कुबडे, तुझे ओठ फारच जाड असले पाहिजेत’ ते ऐकून वासवदत्ता अत्यंत संतापली व म्हणाली, `अरे कुष्ठ्या, राजकन्येला कुबडी म्हणतोस काय?’

उदयनाला हा काय प्रकार आहे हे समजेना. ते जाणण्यासाठी त्याने एकदम पडदा बाजूला सारला. तेव्हा त्या दोघांनाही प्रद्योताला मतलब समजला. ताबडतोड दोघांचे परस्परांवर प्रेम जडले व अवंतीहून पळून जाण्याचा त्यांनी बेत रचला. शुभ मुहूर्तावर मंत्रसिद्धीसाठी एक औषधी आणली पाहिजे म्हणून वासवदत्तेने आपल्या बापाकडून भद्रवती नावाची हत्तीण मागून घेतली. आणि प्रद्योत उद्यानक्रीडेला गेला आहे, असे पाहून तिने व उदयनाने त्या हत्तीणीवर बसून पळ काढला. उदयन हत्ती चालवण्यात पटाईत होताच तथापि त्याच्या मागोमाग पाठवलेल्या शिपायांनी त्याला वाटेत गाठले. वासवदत्तेने बापाच्या खजिन्यातून शक्य तेवढ्या सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्याबरोबर आणल्या होत्या. त्यापैकी एक पिशवी सोडून तिने नाणी रस्त्यात फैलावली. शिपाई ती वेचण्यात गुंतले असता उदयनाने हत्तीणीला पुढे हाकले. पुन्हा शिपायांनी हत्तिणीला गाठले, तेव्हा तसाच प्रयोग करण्यात आला आणि या उपायाने त्या दोघांनी कौशाम्बी गाठली.

उदयन एकदा आपल्या उद्यानात क्रीडेसाठी गेला असता तेथेच झोपला. पिंडोल भारद्वाज भिक्षु जवळच्या एका वृक्षाखाली बसला होता. राजाला झोप लागली आहे, असे पाहून त्याच्या बायका पिंडोल भारद्वाजापाशी गेल्या आणि त्याचा उपदेश ऐकत बसल्या. इतक्यात राजा जागा झाला व रागावून पिंडोल भारद्वाजाच्या अंगावर तांबड्या मुंग्या सोडण्याचा त्याने प्रयत्न केला, असा उल्लेख संयुत्तनिकायाच्या अट्ठकथेत सापडतो. पण पुढे पिंडोल भारद्वाजाचाच उपदेश ऐकून उदयन बुद्धोपासक झाला.

कौशाम्बी येथे घोषित, कुक्कुट आणि पावारिक या तीन श्रेष्ठींनी बुद्धाच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी अनुक्रमे घोषिताराम, कुक्कुटाराम आणि पावारिकाराम असे तीन विहार बांधल्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकथेत आणि धम्मपदअट्ठकथेत सापडतो. (`बौद्धसंघाचा परिचय’, पृ. २३७-२४५ पाहा.)  उदयनाची एक प्रमुख राणी सामावती आणि तिची दासी खुज्जुत्तरा (कुब्बा उत्तरा) या बुद्धाच्या दोन मुख्य उपासिका होत्या. यावरून असे दिसते की, उदयन राजा जरी फारसा श्रद्धाळू नव्हता, तरी कौशाम्बीच्या लोकात बुद्धभक्त पुष्कळ होते आणि भिक्षूंचा योगक्षेम नीट चालवण्यास ते उत्सुक असत.

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1 **प्रस्तावना 2 **प्रस्तावना 3 **प्रस्तावना 4 **प्रस्तावना 5 **प्रस्तावना 6 **प्रस्तावना 7 प्रकरण एक ते बारा 1 प्रकरण एक ते बारा 2 प्रकरण एक ते बारा 3 प्रकरण एक ते बारा 4 प्रकरण एक ते बारा 5 प्रकरण एक ते बारा 6 प्रकरण एक ते बारा 7 प्रकरण एक ते बारा 8 प्रकरण एक ते बारा 9 प्रकरण एक ते बारा 10 प्रकरण एक ते बारा 11 प्रकरण एक ते बारा 12 प्रकरण एक ते बारा 13 प्रकरण एक ते बारा 14 प्रकरण एक ते बारा 15 प्रकरण एक ते बारा 16 प्रकरण एक ते बारा 17 प्रकरण एक ते बारा 18 प्रकरण एक ते बारा 19 प्रकरण एक ते बारा 20 प्रकरण एक ते बारा 21 प्रकरण एक ते बारा 22 प्रकरण एक ते बारा 23 प्रकरण एक ते बारा 24 प्रकरण एक ते बारा 25 प्रकरण एक ते बारा 26 प्रकरण एक ते बारा 27 प्रकरण एक ते बारा 28 प्रकरण एक ते बारा 29 प्रकरण एक ते बारा 30 प्रकरण एक ते बारा 31 प्रकरण एक ते बारा 32 प्रकरण एक ते बारा 33 प्रकरण एक ते बारा 34 प्रकरण एक ते बारा 35 प्रकरण एक ते बारा 36 प्रकरण एक ते बारा 37 प्रकरण एक ते बारा 38 प्रकरण एक ते बारा 39 प्रकरण एक ते बारा 40 प्रकरण एक ते बारा 41 प्रकरण एक ते बारा 42 प्रकरण एक ते बारा 43 प्रकरण एक ते बारा 44 प्रकरण एक ते बारा 45 प्रकरण एक ते बारा 46 प्रकरण एक ते बारा 47 प्रकरण एक ते बारा 48 प्रकरण एक ते बारा 49 प्रकरण एक ते बारा 50 प्रकरण एक ते बारा 51 प्रकरण एक ते बारा 52 प्रकरण एक ते बारा 53 प्रकरण एक ते बारा 54 प्रकरण एक ते बारा 55 प्रकरण एक ते बारा 56 प्रकरण एक ते बारा 57 प्रकरण एक ते बारा 58 प्रकरण एक ते बारा 59 प्रकरण एक ते बारा 60 प्रकरण एक ते बारा 61 प्रकरण एक ते बारा 62 प्रकरण एक ते बारा 63 प्रकरण एक ते बारा 64 प्रकरण एक ते बारा 65 प्रकरण एक ते बारा 66 प्रकरण एक ते बारा 67 प्रकरण एक ते बारा 68 प्रकरण एक ते बारा 69 प्रकरण एक ते बारा 70 प्रकरण एक ते बारा 71 प्रकरण एक ते बारा 72 प्रकरण एक ते बारा 73 प्रकरण एक ते बारा 74 प्रकरण एक ते बारा 75 प्रकरण एक ते बारा 76 प्रकरण एक ते बारा 77 प्रकरण एक ते बारा 78 प्रकरण एक ते बारा 79 प्रकरण एक ते बारा 80 प्रकरण एक ते बारा 81 प्रकरण एक ते बारा 82 प्रकरण एक ते बारा 83 प्रकरण एक ते बारा 84 प्रकरण एक ते बारा 85 प्रकरण एक ते बारा 86 प्रकरण एक ते बारा 87 प्रकरण एक ते बारा 88 प्रकरण एक ते बारा 89 प्रकरण एक ते बारा 90 प्रकरण एक ते बारा 91 प्रकरण एक ते बारा 92 प्रकरण एक ते बारा 93 प्रकरण एक ते बारा 94 प्रकरण एक ते बारा 95 प्रकरण एक ते बारा 96 प्रकरण एक ते बारा 97 प्रकरण एक ते बारा 98 प्रकरण एक ते बारा 99 प्रकरण एक ते बारा 100 प्रकरण एक ते बारा 101 प्रकरण एक ते बारा 102 प्रकरण एक ते बारा 103 प्रकरण एक ते बारा 104 प्रकरण एक ते बारा 105 प्रकरण एक ते बारा 106 प्रकरण एक ते बारा 107 प्रकरण एक ते बारा 108 प्रकरण एक ते बारा 109 प्रकरण एक ते बारा 110 प्रकरण एक ते बारा 111 प्रकरण एक ते बारा 112 प्रकरण एक ते बारा 113 प्रकरण एक ते बारा 114 प्रकरण एक ते बारा 115 प्रकरण एक ते बारा 116 प्रकरण एक ते बारा 117 प्रकरण एक ते बारा 118 प्रकरण एक ते बारा 119 प्रकरण एक ते बारा 120 प्रकरण एक ते बारा 121 प्रकरण एक ते बारा 122 प्रकरण एक ते बारा 123 प्रकरण एक ते बारा 124 प्रकरण एक ते बारा 125 प्रकरण एक ते बारा 126 प्रकरण एक ते बारा 127 प्रकरण एक ते बारा 128 प्रकरण एक ते बारा 129 प्रकरण एक ते बारा 130 प्रकरण एक ते बारा 131 *परिशिष्ट एक ते तीन 1 *परिशिष्ट एक ते तीन 2 *परिशिष्ट एक ते तीन 3 *परिशिष्ट एक ते तीन 4 *परिशिष्ट एक ते तीन 5 *परिशिष्ट एक ते तीन 6 *परिशिष्ट एक ते तीन 7 *परिशिष्ट एक ते तीन 8 *परिशिष्ट एक ते तीन 9 *परिशिष्ट एक ते तीन 10 *परिशिष्ट एक ते तीन 11 *परिशिष्ट एक ते तीन 12 *परिशिष्ट एक ते तीन 13 *परिशिष्ट एक ते तीन 14 *परिशिष्ट एक ते तीन 15 *परिशिष्ट एक ते तीन 16 *परिशिष्ट एक ते तीन 17 *परिशिष्ट एक ते तीन 18