Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एक ते बारा 7

प्रकरण दुसरे

समकालीन राजकीय परिस्थिती

सोळा राष्ट्रें


यो इमेसं सोळसन्नं महाजनपदानं पहुतसत्तरतनान इस्सराधिपच्चं रज्जं कारेय्य, सेय्यथीदं- (१) अंगानं (२) मगधानं (३) कासीनं (४) कोसलानं (५) वज्जीनं (६) मल्लानं (७) चेतीनं (८) वंसानं (९) कुरुनं (१०) पञ्चालानं (११) मच्छानं  (१२) सूरसेनानं (१३) अस्सकानं (१४) अवंतीनं (१५) गंधारानं (१६) कंबोजानं.

हा उतारा अंगुत्तनिकायात चार ठिकाणी सापडतो. ललितविस्तराच्या तिसर्‍या अध्यायातही बुद्ध जन्मला येण्यापूर्वी जंबुद्धीपात (हिंदुस्थानात) निरनिराळी सोळा राज्ये होती असा उल्लेख आहे; पण त्यापैकी आठ राज्यातील राजकुलांचे तेवढे वर्णन आढळते. या सर्व देशांचा उल्लेख बहुवचनी आहे. यावरून असे दिसून येते की, एका काळी हे देश महाजनसत्ताक होते. यातील महाजनांना राजे म्हणत आणि त्यांच्या अध्यक्षाला महाराजा म्हणत असत. बुद्धसमकाली ही महाजनसत्ताक पद्धति दुर्बल होऊन नष्ट होण्याच्या मार्गाला लागली; आणि तिच्या जागी एकसत्ताक राज्यपद्धति जोराने अमलात येत चालली होती. या घडामोडीची कारणे काय असावीत याचा विचार करण्यापूर्वी वरील सोळा देशासंबंधाने सापडणारी माहिती संक्षेपरूपाने येथे दाखल करणे योग्य वाटते.
अंगा

अंगांचा देश मगधाच्या पूर्वेला होता. त्याच्या उत्तर भागाला अंगुत्तराप म्हणत. मगध देशाच्या राजाने अंग देश जिंकल्यामुळे तेथील महाजनसत्ताक पद्धति नष्ट झाली. पूर्वीच्या महाजनांचे किंवा राजांचे वंशज होते, तरी त्यांची स्वतंत्र सत्ता राहिली नाही; आणि कालांतराने `अंगमगधा’ असा त्या देशाचा मगध देशाशी द्वंद्वसमासात निर्देश होऊ लागला.

बुद्ध भगवान् त्या देशात धर्मोपदेश करीत असे व त्या देशाच्या मुख्य शहरांत- चंपा नगरीत- गग्गरा राणीने बांधलेल्या तलावाच्या काठी तो मुक्कामा राहत असे, असा त्रिपिटिक ग्रंथात पुष्कळ ठिकाणी उल्लेख सापडतो. पण हे चंपा नगर देखील एखाद्या जुन्या राज्याच्या ताब्यात नव्हते. बिंबिसार राजाने ते सोणदंड नावाच्या ब्राह्मणाला इनाम दिले. या इनामाच्या उत्पन्नावर सोनदंड ब्राहमण मधून मधून मोठमोठाले यज्ञयाग करीत होता. (दीघनिकाय `सोणदण्डसुत्त’ पाहा.)

२. मगधा

बुद्धकाळच्या राज्यात मगध आणि कोसल या देशांची एकसारखी भरभराट होत चालली होती; आणि ती राष्ट्रे एकसत्ताक राज्यपद्धतीच्या कह्यात पूर्णपणे सापडली होती. मगधांचा राजा बिंबिसार आणि कोसलांचा राजा पसेनदि (प्रसेनजित्) हे दोघेही महाराजे उदारधी असल्यामुळे त्यांची एकसत्ताक राज्यपद्धति प्रजेला फार सुखावह झाली. हे दोघेही राजे यज्ञयागांना उत्तेजन देत होते खरे, तथापि श्रमणांना (परिव्राजकांना) त्यांच्या राज्यात आपला धर्मोपदेश करण्याला पूर्णपणे मुभा होती. एवढेच नव्हे तर बिंबिसार राजा त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था करून त्यांना उत्तेजन देत असे. गोतम जेव्हा प्रथमत: संन्यास घेऊन राजगृहाला आला तेव्हा बिंबिसार राजाने पांडवपर्वताच्या पायथ्याशी जाऊन त्याची भेट घेतली, आणि त्याला आपल्या सैन्यात मोठी पदवी स्वीकारण्याची विनंती केली. पण गोतमाने आपला तपश्चर्या करण्याचा निश्चय ढळू दिला नाही. गयेजवळ उरुवेला येथे जाऊन त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय ढळू दिला नाही. गयेजवळ उरुवेला येथे जाऊन त्याने तपश्चर्या आरंभिली, आणि शेवटी तत्त्वबोधाचा मध्यम मार्ग शोधून काढला. वाराणसीला पहिला उपदेश करून आपल्या पाच शिष्यांसह बुद्ध भगवान जेव्हा राजगृहाला आला, तेव्हा बिंबिसार राजाने त्याला आणि त्याच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी वेळुवन नावाचे उद्यान दिले. या उद्यानात एखादा विहार होता, असा उल्लेख कोठेच सापडत नाही. बिंबिसार राजाने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला येथे निर्विघ्नपणे राहण्याची परवानगी दिली, एवढाच या वेळुवनदानाचा अर्थ समजला पाहिजे. परंतु त्यावरून भिक्षुसंघाविषयी त्याचा आदर स्पष्ट दिसतो.

केवळ बुद्धाच्याच भिक्षुसंघासाठी नव्हे, तर यावेळी जे श्रमणांचे मोठमोठाले संघ होते त्यांनाही बिंबिसार राजाने आश्रय दिला होता. एकाच वेळी हे श्रमणसंघ राजगृहाच्या आसपास राहत होते. असा उल्लेख दीघनिकायांतील सामञ्ञफलसत्ताक आणि मज्झिमनिकायांतील (नं. ७७) महासकुलुदायिसुत्तात आढळतो.

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1 **प्रस्तावना 2 **प्रस्तावना 3 **प्रस्तावना 4 **प्रस्तावना 5 **प्रस्तावना 6 **प्रस्तावना 7 प्रकरण एक ते बारा 1 प्रकरण एक ते बारा 2 प्रकरण एक ते बारा 3 प्रकरण एक ते बारा 4 प्रकरण एक ते बारा 5 प्रकरण एक ते बारा 6 प्रकरण एक ते बारा 7 प्रकरण एक ते बारा 8 प्रकरण एक ते बारा 9 प्रकरण एक ते बारा 10 प्रकरण एक ते बारा 11 प्रकरण एक ते बारा 12 प्रकरण एक ते बारा 13 प्रकरण एक ते बारा 14 प्रकरण एक ते बारा 15 प्रकरण एक ते बारा 16 प्रकरण एक ते बारा 17 प्रकरण एक ते बारा 18 प्रकरण एक ते बारा 19 प्रकरण एक ते बारा 20 प्रकरण एक ते बारा 21 प्रकरण एक ते बारा 22 प्रकरण एक ते बारा 23 प्रकरण एक ते बारा 24 प्रकरण एक ते बारा 25 प्रकरण एक ते बारा 26 प्रकरण एक ते बारा 27 प्रकरण एक ते बारा 28 प्रकरण एक ते बारा 29 प्रकरण एक ते बारा 30 प्रकरण एक ते बारा 31 प्रकरण एक ते बारा 32 प्रकरण एक ते बारा 33 प्रकरण एक ते बारा 34 प्रकरण एक ते बारा 35 प्रकरण एक ते बारा 36 प्रकरण एक ते बारा 37 प्रकरण एक ते बारा 38 प्रकरण एक ते बारा 39 प्रकरण एक ते बारा 40 प्रकरण एक ते बारा 41 प्रकरण एक ते बारा 42 प्रकरण एक ते बारा 43 प्रकरण एक ते बारा 44 प्रकरण एक ते बारा 45 प्रकरण एक ते बारा 46 प्रकरण एक ते बारा 47 प्रकरण एक ते बारा 48 प्रकरण एक ते बारा 49 प्रकरण एक ते बारा 50 प्रकरण एक ते बारा 51 प्रकरण एक ते बारा 52 प्रकरण एक ते बारा 53 प्रकरण एक ते बारा 54 प्रकरण एक ते बारा 55 प्रकरण एक ते बारा 56 प्रकरण एक ते बारा 57 प्रकरण एक ते बारा 58 प्रकरण एक ते बारा 59 प्रकरण एक ते बारा 60 प्रकरण एक ते बारा 61 प्रकरण एक ते बारा 62 प्रकरण एक ते बारा 63 प्रकरण एक ते बारा 64 प्रकरण एक ते बारा 65 प्रकरण एक ते बारा 66 प्रकरण एक ते बारा 67 प्रकरण एक ते बारा 68 प्रकरण एक ते बारा 69 प्रकरण एक ते बारा 70 प्रकरण एक ते बारा 71 प्रकरण एक ते बारा 72 प्रकरण एक ते बारा 73 प्रकरण एक ते बारा 74 प्रकरण एक ते बारा 75 प्रकरण एक ते बारा 76 प्रकरण एक ते बारा 77 प्रकरण एक ते बारा 78 प्रकरण एक ते बारा 79 प्रकरण एक ते बारा 80 प्रकरण एक ते बारा 81 प्रकरण एक ते बारा 82 प्रकरण एक ते बारा 83 प्रकरण एक ते बारा 84 प्रकरण एक ते बारा 85 प्रकरण एक ते बारा 86 प्रकरण एक ते बारा 87 प्रकरण एक ते बारा 88 प्रकरण एक ते बारा 89 प्रकरण एक ते बारा 90 प्रकरण एक ते बारा 91 प्रकरण एक ते बारा 92 प्रकरण एक ते बारा 93 प्रकरण एक ते बारा 94 प्रकरण एक ते बारा 95 प्रकरण एक ते बारा 96 प्रकरण एक ते बारा 97 प्रकरण एक ते बारा 98 प्रकरण एक ते बारा 99 प्रकरण एक ते बारा 100 प्रकरण एक ते बारा 101 प्रकरण एक ते बारा 102 प्रकरण एक ते बारा 103 प्रकरण एक ते बारा 104 प्रकरण एक ते बारा 105 प्रकरण एक ते बारा 106 प्रकरण एक ते बारा 107 प्रकरण एक ते बारा 108 प्रकरण एक ते बारा 109 प्रकरण एक ते बारा 110 प्रकरण एक ते बारा 111 प्रकरण एक ते बारा 112 प्रकरण एक ते बारा 113 प्रकरण एक ते बारा 114 प्रकरण एक ते बारा 115 प्रकरण एक ते बारा 116 प्रकरण एक ते बारा 117 प्रकरण एक ते बारा 118 प्रकरण एक ते बारा 119 प्रकरण एक ते बारा 120 प्रकरण एक ते बारा 121 प्रकरण एक ते बारा 122 प्रकरण एक ते बारा 123 प्रकरण एक ते बारा 124 प्रकरण एक ते बारा 125 प्रकरण एक ते बारा 126 प्रकरण एक ते बारा 127 प्रकरण एक ते बारा 128 प्रकरण एक ते बारा 129 प्रकरण एक ते बारा 130 प्रकरण एक ते बारा 131 *परिशिष्ट एक ते तीन 1 *परिशिष्ट एक ते तीन 2 *परिशिष्ट एक ते तीन 3 *परिशिष्ट एक ते तीन 4 *परिशिष्ट एक ते तीन 5 *परिशिष्ट एक ते तीन 6 *परिशिष्ट एक ते तीन 7 *परिशिष्ट एक ते तीन 8 *परिशिष्ट एक ते तीन 9 *परिशिष्ट एक ते तीन 10 *परिशिष्ट एक ते तीन 11 *परिशिष्ट एक ते तीन 12 *परिशिष्ट एक ते तीन 13 *परिशिष्ट एक ते तीन 14 *परिशिष्ट एक ते तीन 15 *परिशिष्ट एक ते तीन 16 *परिशिष्ट एक ते तीन 17 *परिशिष्ट एक ते तीन 18