Android app on Google Play

 

राजसी तामसी जें गाणें । त...

 

राजसी तामसी जें गाणें । तोडी ताल मोडी मान ॥१॥
ख्याल गाये कंपस्वर । रिझवी दात्याचें अंतर ॥२॥
हे तों प्रीति धनावरी । अर्था अनर्थ तो करी ॥३॥
नामा म्हणे शास्त्रार्थ । अर्थ तोचि होय स्वार्थ ॥४॥