Android app on Google Play

 

लग्न आणि आपण भाग २

आपण जीवनाकडे जास्त कधीच मागितलं नाही, अपेक्षा हीच होती कि हाती जास्त काही आलं नाही तरी अपेक्षा भंग होवू नये. तरी सुद्धा कधी कधी वाटू लागत कि आपल्या अपेक्षा वाजवी पेक्षा जास्तच होत्या का?
मी काही सुंदर म्हणण्या सारखे नव्हते हे मला पूर्वी पासून ठावूक होते. मला कुणी जॉन अब्राहम सापडावा अशी अपेक्षा सुद्धा मुळीच नव्हती. स्वतःची अशी स्वप्ने होती. अर्थशास्त्राची पदवी व पुढील शिक्षण घ्यावे अशी मनापासून इच्छा होती. आईने इन्जिन्यरिन्ग ला घातले. मी मुकाट पणे मन मारले. B.E. केल्यास चांगला मुलगा मिळेल अशी त्यांची कल्पना होती. मुळात माझी निर्णय घेण्याची क्षमता ह्यावरच त्यांचा विश्वास नव्हता.

खरोखरच मला जास्त काहीच नको होते. हा मला भेटला तेव्हाच वाटले कि काही तरी निर्णय घ्यावा. माझा निर्णय बरोबर आहे हे मनात ठसले होते. दुसरा कोणाच विचार मनात नव्हता. त्याने सुद्धा सुरुवातीला किती उत्साह दाखवला होता. माझ्या आयी वडिलांना कधी माझ्या साठी वेळ काढता आलं नाही तेव्हडा वेळ तो मला देत होता. प्रत्येक गोष्टीत फक्त त्याचाच आधार वाटत गेला. मैत्री प्रेमात कधी बदलली कधीच समजले नाही. म्हजी स्वतःची सारी स्वप्ने विसरून मला फक्त त्याचाच ध्यास लागला होता. त्याची स्वप्ने तीच माझी स्वप्ने, त्याचे जीवन तेच माझे जीवन हीच मनाची समजूत करून मी जगत आले. पण आता वाटते कि ते बरोबर होते का? त्याच्यासाठी मी आपल्या आई वडिलाकडे भांडले, स्वताच्या सर्व सुखानं तिलांजली दिली. हृदयात खोल वर कुठे तरी गाडून टाकलेल्या त्या स्वप्नांना कधी तरी जाग आली तर डोळ्यातून अश्रू आल्या शिवाय राहत नाहीत. त्याला हे कधीच कळले नसावे.

मी मठ्ठ आहे असे त्याला वाटते. मी त्याला वारंवार फोन करते कारण त्याच्या प्रत्येक क्षणात मी त्याची सोबत करावी हीच माझी इच्छा असते. त्याला वाटते कि मला दुसरे काही काम नसते. आई कधी फोने करते. तिला मी कधी जाणवू देत नाही पण म्हज्या मनातील व्यथा तिला न सांगता सुद्धा समजून जाते. प्रीती सर्वेश कडे लग्न होवून आता ऑस्ट्रालीअत स्थायिक झाली. दर महिन्याला तिचे आणि तिच्या पतिचे फोटो ती फेसबुक वर टाकत असते. हा मात्र मला घेवून सिनेमाला जाण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत असतो. त्याला वेळ नसतो हे मी समजू शकते पण कधी तरी एकदा माझ्या भावना समजाव्यात एव्हडीच माझी अपेक्षा का तो पूर्ण करू शकत नाही हे मला समजत नाही.

आम्ही पहिल्यांदा कधी भेटलो, पहिल्यांदा त्याने माझा हात केव्हा धरला, पहिला चुंबन कधी घेतलं , हे सगळं सगळं मला याद आहे. त्याला लग्नाचा वाढदिवस सुद्धा लक्षात येत नाही.
माझ्या पेक्षा जास्त विश्वास मी त्याच्यावर टाकला. भले त्याच्याकडे त्यावेळी काहीच नव्हते, मी पैसे भाघून प्रेमान पडले नव्हते पण लग्नानंतर मला तो जपेल, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल अशी वेडी अशा बाळगूनच मी जगते होते अजूनही जगत आहे.

असा एक दिवस येयील जेव्हा फक्त मी आणि तोः बरोबर असेल. मला तोः फुला प्रमाणे जपेल, लहान मुला प्रमाणे वागवेल. आम्ही आमच्या मुलांची नावे सुद्धा लग्नाआधीच ठरवू. इतर मुलींच्या प्रियकरांप्रमाणे तोः मला क्षणो क्षणी कॉल करेल . त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे हे तोः प्रत्येक भेटीत सांगेल. हीच एक वेडी अपेक्षा मी मनात बाळगून होते. आज पर्यंत मी ती अपेक्षा पूर्ण होण्याची वात बघत आहे.

अभिरुची मासिक खंड १

संपादक - अभिरुची मासिक
Chapters
लग्न आणि आपण
लग्न आणि आपण भाग २
Abortion. [Serious horror story]
बस नावाची संस्था