अद्वैत
देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥
डोळियाचा डोळा दृष्टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥
नवल वाटलें नवल वाटलें । देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४॥