नाममहिमा.
भेदाभेद कर्म नकळे त्याचें वर्म । वाउगाचि श्रम वाहतां जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच नकळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतो ॥४॥