Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मृगतृष्णा

आज संध्याकाळी अजिंक्यच्या घरी आल्यावर बाप लेकाने रात्री रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत आखला होता. जेवायला जाताना कारमध्ये हे दोघ पुढे अन मी मागे बसले. त्या दोघांच्या गप्पा टप्पा सुरू होत्या.

मी त्यांच्या बरोबर असून देखील मनाने त्यांच्यात नव्हते. मागच्या १४/१५ वर्षांपासून असेच सुरू आहे. लग्न झालं मूल झालं, पण मी मनाने कुठेच नव्हते, होतं नुसतं शरीर. दैनंदिनीचे व्यवहार चालू होते, पण रस कशातच नव्हता. बरोबर १५ वर्ष झाले त्याला जाऊन, पण माझं मन व डोळे त्यालाच शोधत होते.

आम्ही जवळ पास १०/१२ वर्ष शेजारी राहत होतो, इतका काळ खूप असतो दोन कुटुंबांना जवळ यायला. आम्ही दोघेही एक मेकनं पसंत करायचो, पण कधीही ह्या भावना व्यक्त करू शकलो नाही.

माझं लग्न दुसरीकडे झालं, संसार देखील सुरू झाला. पण मनाने मी त्याचीच होते. 'तो' ह्याच शहरात राहत होता, अधून मधून ओळखीतल्या लोकांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळत होती, ते ऐकून मन अस्वस्थ होत होत. आणि डोळे त्याचा शोध घेऊ लागायचे. त्याचा कारचा रंग व मॉडेल कळल्यापासून तर जेव्हा कधी घराबाहेर पडायचे तेव्हा त्या रंगाची कार व त्याच मॉडेलची कार जवळून निघाल्यावर सतत ही जाणीव व्हायची की ह्या कारमध्ये तो तर नसेल? त्याचा फोननंबर ही मीळाला , पण कधी फोन लावायची हिम्मत झाली नाही.

वेळ पुढे सरकत गेला,जवळच सर्व काही बदललं पण नाही बदललं ते माझं मन. ते त्याच्या शोधात होत.

रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आम्ही तिघही कॉर्नरच्या टेबलावर बसलो जेवणाचा ऑर्डर दिल्यावर, बाप लेकांचे बोलणे तसेच सुरू होते. मी इकडे तिकडे बघत होते, अचानक माझं लक्ष्य त्याच्यावर गेला, 'तो' माझ्या समोर होता, खरंच तो माझ्या समोर होता पण माझा विश्वासच बसत नव्हता, ज्या क्षणाचा इतक्या वर्षांपासून मन आतुर होत तो क्षण हाच होता जाणवलं आणि सर्व विश्व पोझ झालय.

थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर जाणवलं की 'तो' एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याची बायको व दोन मूलही होते. जवळ पास 'तो 'दीड तास माझ्या समोर होता, पण मी त्याला दिसलेच नाही, पण माझं सर्व लक्ष्य त्याच्याकडे होत, अन 'तो' पूर्णपणे स्वतःच्या संसाराशी एकजीव झाला होता. कुठल्याही प्रकारची तड जोड त्याचा वागण्यातून दिसत नव्हती. 'तो' पूर्णपणे संसाराशी एकाकार झाला होता. ऐकाऐक मला जाणवलं की माझं मन आता पूर्णपणे शांत झालं होत.'तो' खूश होता, आणि आता मीपण मनापासून शांत व खूश होते. जणू 'मृगतृष्णा' भागली गेली होती व रेस्टॉरंटच्या बाहेर पडताना माझं मन तृप्त होत.

'मृगतृष्णा' भागल्याची तृप्ती. अजिंक्यने कारचे दार उघडल्यावर, मी आता त्या दोघांसोबत कारमध्ये बसत होते, त्या दोघान मध्ये एकाकार व्हायला.