Get it on Google Play
Download on the App Store

पौगंडावस्थेतील शारीरिक बदल

८ वर्षा खालील सर्व मुले मुली जवळ जवळ सारखीच असतात पण ८ ते १४ ह्या दरम्यान मुलं मुलींच्या शरीराची वाढ वेगवेगळ्या पद्धतीने होते. मुलींची पौगंडावस्था मुला पेक्षा आधी येते. 

मुलीं मधील बदल :

१. स्तनांची वाढ 
२. नितंबांची वाढ 
३. गुप्तांगाच्या ठिकाणी केस येणे 
४. मासिक पाळीची सुरुवात. बहुतेक वेळा ह्या बरोबर पोटांत काळ येणे, भावनिक बदल इत्यादी गोष्टी सुद्धा होतात.

मुला मधील बदल 

१. आवाज घोगरा होणे 
२. शारीरिक वाढ वेगाने होणे 
३. गुप्तांगाच्या ठिकाणी केस येणे 


हे बदल नक्की कधी आणि कोणत्या प्रमाणात होतात हे फक्त आपल्या आईवडिलांच्या जनुकांवर आणि आहारावर अवलंबून असते. हे सर्व बदल पूर्णपणे नैसर्गकिक असून ह्यांत काहीही वावगे नसते. बहुतेक वेळा मुला मुलींना ह्या वेळी आपल्यांत होणारे बदल नैसर्गिक आहेत कि नाहीत ह्याची फार चिंता होते पण ९९.९९% वेळा हे सर्व बदल नैसर्गिक असतात. ह्या वयांत मुलाना जर काही शंका असतील तर त्या डॉक्टर किंवा इतर जाणकार मंडळींकडून निरसून घेणे आवश्यक आहे.