Get it on Google Play
Download on the App Store

स्तनांचा आकार

ज्या प्रमाणे पुरुषांत लिंगांची लांबी ह्यावरून न्यूनगंड असतो त्याच प्रमाणे स्त्रियांत स्तनांचा आकार ह्यावरून न्यूनगंड असू शकतो. स्तनांचा आकार पौगंडावस्थेत वाढायला लागतो. स्तनांचा आकार एस्ट्रोजन ह्या हार्मोनवर अवलंबून असतो. एख्याद्या मुलीने संभोग करायला सुरुवात केली तर शरीरातील ह्या हार्मोनचे प्रमाण बदलून त्यामुळे स्तनांचा आकार सुद्धा बदलू शकतो. स्तनांचा आकार बहुतांशी आपल्या हार्मोन लेव्हल वर अवलंबून असला तर शरीराचे वजन वाढले तर उरोज सुद्धा मोठे होतात आणि वजन कमी केले असता उरोज सुद्धा छोटे होतात. 

स्तन इतके छोटे तितके त्यातील मज्जातंतू जास्त घनतेने असतात त्यामुळे ते जास्त संवेदनशील असतात. ह्या उलट मोठे उरोज कमी संवेदनशील असतात.