Get it on Google Play
Download on the App Store

गर्भ निरोधक

 अवेळी गर्भधारणा झाल्याने माता,  अपत्यालाही शकतो. त्यासाठी शारीरिक संबंध तेहवताना काळजी घेणे जरुरीचे आहे. आज देशांत अनेक प्रकारचे गर्भनिरोधक आहेत. 

१. निरोध किंवा कंडोम 

हा प्रकार रावांच्या सोपा आणि कमी खर्चाचा आहे. निरोध हा एक फुग्या सारखा दिसणारा लॅटेक्स ह्या पदार्थाचा असतो. ताठ शिश्नावर त्याला मोज्याप्रमाणे चढवून  संभोग केला तर वीर्य त्यांत पडते त्यामुळे गर्भ राहण्याचा प्रश्नच राहत नाही. त्याशिवाय कातडीचा संबंध ना आल्याने गुप्तरोग सुद्धा होत नाहीत. लग्न होण्याआधी जर संभोग करायचा असेल तर हा सर्वांत चांगला उपाय आहे. लग्नानंतर तोंडाने घेण्याच्या गोळ्या हा सुद्धा चांगला उपाय आहे. 

२. तोंडाने घेण्याच्या गोळ्या 

ह्या गोळ्या दररोज घ्याव्या लागतात किंवा डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे घ्याव्या लागतात. ह्या गोळ्यामुळे गर्भ राहत नाही पण गुप्तरोगापासून रक्षण होत नाही. 

३. आणीबाणी च्या वेळी घेण्याची गोळी 

समाजा आपण गर्भनिरोधक ना घेता संभोग केला किंवा काही कारणाने कंडोम फुटला तर ipill सारखी गोळी तात्काळ घेतल्याने गर्भ राहत नाही. ह्या गोळ्यांचे काही साईड इफेक्त्त असतात त्यामुळे अशी गोळी वारंवार घेऊ नये. ह्या गोळीचे दुष्परिणाम म्हणजे पुढची मासिक पाळी खूप आधी किंवा खूप नंतर येऊ शकते.