Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

जगात इतरत्र

जपानी सैन्यात भाले नव्हते.

१९४५ सालापूर्वी यूरोपात जर्मनी व पोलंड भालाईत घोडदळाबद्दल विशेष प्रसिद्ध होते. १८९० मध्ये जर्मन सम्राट दुसरा विल्यम याने जर्मनीचे सर्व त्र्याण्णव रिसाले भालाईत केले.

जर्मनीच्या घोडदळाची नक्कल ग्रेट ब्रिटनने केली. यूरोपात पहिल्या महायुद्धानंतर घोडदळाच्या अस्ताबरोबर भाल्यांचाही अस्त झाला. अमेरिकेत भाले वापरातच नव्हते. प्राचीन ग्रीसच्या सैन्यात हॉपलाइटपायदळ ३ मी. ते ६.५० मी. लांबीचे सारिसाभाले आक्रमण व संरक्षणासाठी आणि घोडेस्वार ३ मी. लांबीचे भाले फेकण्यासाठी व द्वंद्वयुद्धासाठी वापरीत.

ग्रीक घोडेस्वारांना रिकीब माहीत नव्हती.

इराणी घोडेस्वार भालाफेकीसाठी प्रसिद्ध होते.

अँसिरियन सैन्यात मोठ्या प्रमाणावर भालाईत घोडेस्वार व पायदळ होते. भाल्यांची पाती लोखंडी व काशाची असत.

अरब आणि तुर्की घोडेस्वार व उंटस्वार उत्तम भालाईत व धनुर्धारी होते,

चिनी सैन्यात भाला प्रिय नव्हता; त्यांची धनुर्बाणावर भिस्त होती.लढाईत भालांचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जाई.