Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

युद्ध व्यतिरिक्त

 काटेयुक्त भाल्यांनी मासेमारी (हार्पून) करण्याची पद्धतपुरातन कालापासून चालत आली आहे. मैदानी खेळांच्या चढाओढींत प्रासक्षेप (जॅव्हेलिन थ्रो) ही चढाओढ असते. दुर्गादेवी व शंकर यांच्या हातात भालासदृश शक्ती, शूल व त्रिशूळ दिसतात. भाला व भालेकरी यांच्यावरून मराठीत काही म्हणी-वाक्यप्रचारही रूढ झालेले आहेत. (उदा. खांद्यावर भाला, जेवावयास घाला इत्यादी) भाल्याचे शिक्षण घेण्यासाठी दंडाच्या टोकाला फाळाऐवजी कापडी चेंडू लावीत. अशा भाल्याला बोथाटी म्हणतात. सलाम, बंद, बेल, दुहेरी बेल असे काही भाल्याचे हात आहेत. शत्रुचा भाला उडविणे, अडविणे, हूल देऊन भाल्याचा वार करणे इ. युक्त्या शिकाव्या लागतात. भाल्याच्या खेळात डुकराची शिकार (पिग् स्टिकिंग) हा शिकारीवजा खेळ १९४७ सालापूर्वी फार प्रिय होता. संस्थानिक, सैनिक व हौशी श्रीमंतांना हा शिकारवजा खेळ परवडत असे. जयपूर, कोल्हापूर इ. संस्थानांत हा खेळ प्रसिद्ध होता. मीरत या गावापाशी होणारी *‘खादीर चषक’*नावाची रानडुकराची शिकारी-स्पर्धा जगविख्यात होती.

संदर्भ: Pant, G. N. Studies in Indian Weapons and Warfare,
New Delhi, 1970