Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वेदारम्भ संस्कार

हा संस्कार ज्ञानार्जानाशी संबंधित आहे. वेद याचा अर्थ आहे ज्ञान. आणि वेदारम्भाच्या माध्यमातून बाळाने आता ज्ञानार्जनाला सुरुवात करावी असा या संस्काराचा अभिप्राय आहे. शास्त्रांत ज्ञाना इतका दुसरा कोणताही प्रकाश मान्य केलेला नाही. स्पष्ट आहे की प्राचीन काळी या संस्काराला मानवी जीवनात विशेष महत्त्व असणार. मुंज झाल्यानंतर बालकांना वेदांचे अध्ययन आणि विशिष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य आचार्यांजवळ गुरुकुलात पाठवण्यात येई. वेदारंभ संस्काराच्या आधी आचार्य आपल्या शिष्यांकडून ब्रम्हचर्य व्रताचे पालन आणि संयमित जीवन जगण्याची प्रतिज्ञा करून घेत असत. आणि त्याची परीक्षा घेतल्यानंतरच वेदाध्ययन करून घेत असत. असंयमित जीवन जगणारे वेदांच्या अध्ययनाला योग्य समजले जात नसत. आपले चारही वेद ज्ञानाचे अखंड भांडार आहेत.