Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कर्णवेध संस्कार (कान टोचणे)

आपल्या मुनींनी देखील सर्व संस्कार वैज्ञानिक कसोटींत खरे उतरल्या नंतरच त्यांचा प्रारंभ केला आहे. कर्णवेध संस्काराचा आधार पूर्णपणे वैज्ञानिक आहे. बाळाचे शारीरिक व्याधींपासून संरक्षण व्हावे हाच यामागचा हेतू आहे. प्रकृतीदत्त या शरीराची सर्व अंग महत्त्वपूर्ण आहेत. कान आपले श्रवण द्वार आहेत. कान टोचल्याने व्याधी दूर होतात तसेच ऐकण्याची शक्ती देखील वाढते. याच्या सोबतच कानांत दागिने घालणे हा आपल्या सौंदर्य दृष्टीचा परिचयच आहे.

यज्ञोपवीत (मुंज) संस्काराच्या आधी हा संस्कार करण्याचे विधान आहे. प्रत्यक्षात आपल्याकडे बाळ अगदी लहान असतानाच त्याचे कान टोचून घेतले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्ल पक्षातील शुभ मुहूर्तावर या संस्काराचे संयोजन उत्तम आहे.