Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

यज्ञोपवीत /उपनयन संस्कार (मुंज)

यज्ञोपवीत (संस्कृत संधी विच्छेद= यज्ञ+उपवीत) शब्दाचे दोन अर्थ आहेत. उपनयन संस्कार ज्यामध्ये जानवे घातले जाते. मुंडन आणि पवित्र पाण्याचे स्नान हे देखील या संस्काराचे भाग आहेत. सुतापासून बनलेले तीन धाग्यांचे हे पवित्र बंधन यज्ञोपवीतधारक व्यक्ती डाव्या खांद्याच्या वरून आणि उजव्या काखेच्या खाली असे तिरके परिधान करते. यज्ञाद्वारे संस्कार केले गेलेले उपवीत, यज्ञसुत्र.

यज्ञोपवीत एका विशिष्ट धाग्याला विशेष विधींनी गाठ बांधून करून तयार केले जाते. यामध्ये सात गाठी मारण्यात येतात. ब्राम्हणाच्या जानव्यात ब्राम्हगाठ असते. तीन धागे असलेले हे जानवे गुरुंनी दीक्षा दिल्यानंतर कायम धारण केले जाते. हे तीन धागे हिंदू त्रिमूर्ती ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहेत. अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलले जाते. जानवे धारण केल्याशिवात्य अन्न आणि पाणी ग्रहण केले जात नाही. यज्ञोपवीत धारण करण्याचा मंत्र आहे - यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् ।आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ||