Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वेढ्यानंतर

यानंतर २००० वर्षे किल्ला दुर्लक्षित राहिला असावा. मात्र किल्ल्याची तटबंदी व वरील इमारती ज्या वेढ्यातून व आगीतून वांचलीं असतील तीं हळूहळू ढासळत गेली मात्र २००० वर्षांनंतरहि टिकून राहिलीं आहेत.  
दुसर्या महायुद्धानंतर इस्रायल देश निर्माण झाल्यावर या किल्ल्याचा पद्धतशीर शोध घेतला गेला व उत्खनन केले गेले. पाउस नसल्यामुळे, २००० वर्षे लोटली तरीहि किल्ला, त्यावरील अनेक वास्तु, पडझड होऊनहि उत्तम अवस्थेत मोकळे करता आले. हेरोडचा राजवाडा,एक  सिनॅगॉग, इतर अनेक इमारती, हमामखाने, भिंतींवरचे रंगकाम, सुंदर गिलावा, वरखाली जाण्याच्या पायर्यांच्या वाटा, पाणी साठवण्याची योजना अशा सर्व गोष्टी पद्धतशीर उत्खनन करून मोकळ्या केलेल्या आहेत व आता नीटपणे पाहतां येतात. हे आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. वर जाण्यासाठी केबल कार आहे. रोमनांचा कॅंप, त्यानी बांधलेली वेढ्याची भिंत, त्यानी निर्मिलेला Rampart, असे सर्व व्यवस्थित पाहता येते. पायथ्याशी एक म्युझियम बनले आहे. अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. मॉडेल्स बनवलेली आहेत.अनेक फोटो उपलब्ध आहेत.
याच किल्ल्याच्या पार्श्व्भूमीवर लिहिलेली एक कादंबरी गेल्या वर्षी माझ्या वाचनात आली. तीमध्ये किल्ल्याचे अतिशय विस्तृत वर्णन वाचावयास मिळाले व किल्ल्यावरील भीषण संहाराची जोसेफस फ्लेविअसने लिहून ठेवलेली कथाहि वाचली. त्यानिमित्ताने,  इतर वाचनातून व GOOGLE वरून शोध घेऊन ही सर्व कथा मला मिळाली. आपणास ती अद्भुत वाटली व आवडली असेल असे वाटते. किल्ल्याचे अनेक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातले काही  मी मिळवले आहेत. ते पाहून जास्त कल्पना येईल. कधी इस्रायलला गेलात तर किल्ला पहावयास विसरू नका.