Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

गस टेलर

गस टेलर १८ महिन्यांचा होता जेव्हा त्याला वाटलं की तो स्वतःचा आजोबा आहे. अनेक वेळा लहान मुले स्वतःच्या ओळखीबाबत संभ्रमित होतात, पण हे प्रकरण वेगळं होतं. त्याच्या आजोबांचा मृत्यू त्याच्या जन्माच्या १ वर्ष अगोदर झाला होता पण आपणच आपले आजोबा असल्याचं तो मानत होता. कुटुंबाचे जुने फोटो दाखवल्यावर गस ने आजोबांचा ४ वर्षांचे असतानाचा फोटो ओळखला. कुटुंबातील एका रहस्याबद्दल गास समोर कोणीच कधीही उल्लेख केला नव्हता - आजोबांच्या बहिणीची कोणीतरी हत्या करून प्रेत सन फ्रांसिस्को किनाऱ्यावर फेकले होते. परिवाराला धक्का बसला जेव्हा ४ वर्षांच्या गसने आपल्या मृत बहिणीबद्दल उल्लेख केला. गसच्या म्हणण्याप्रमाणे देवाने त्याला एक तिकीट दिले ज्यामुळे तो एका विवरातून चालू शकत होता, ज्यानंतर त्याने गसच्या रूपाने जन्म घेतला.