Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

निष्कर्ष

 पाहिलंत? कसा या लोकांना पुनर्जन्म मिळाला आणि त्यांच्या मनात मागील जन्माच्या आठवणीही कायम राहिल्या. विज्ञान, वैज्ञानिक काही म्हणोत, पण हे सत्य आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही अशी अनाकलनीय रहस्य आणि प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं कोणीच देऊ शकत नाही. कोणाला आगीची भीती वाटते, तर कोण अंधाराला घाबरतं. कोणी आयुष्यभर प्रेमाच्या शोधात राहतात. असं म्हणतात की मागच्या जन्मीची कृत्य या जन्मात आपली फळे देतात. कदाचित माणसाला जीवनात मिळणाऱ्या व्यथांच हेही प्रमुख कारण असेल. काही असो, हा विषय एका उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे आणि त्यातील प्रश्नांची उत्तरं कोणाकडेही नाहीत. हे सर्व वाचल्यावर तुम्हाला काय वाटते?