Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पाश्चिमात्य संस्कृतीतील पुनर्जन्म


गेल्या काही दशकांत पश्चिमी देशांतील अनेक लोकांनी पुनर्जन्म संकल्पनेमध्ये स्वारस्य दाखवलं आहे. द रीन्कार्नाशन ऑफ़ पीटर प्राउड , डेड अगेन,  कुंडून , फ्लूक , व्हाट ड्रीम्स मे बिकम , मम्मी , बिर्थ , चांसेस आर और क्लाउड एटलस यांसारखी लोकप्रिय पुस्तके आणि कैरोल बोमन आणि विक्की मच्केंजी या समकालीन लेखकांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट आणि अनेक लोकप्रिय गाणी पुनर्जन्मावर आधारित आहेत.

 

शंकेखोर कार्ल सगन ने दलाई लामांना विचारलं की तुमच्या धर्माच्या या एका मुलभूत सिद्धांताला विज्ञाना ने नाकारले तर तुम्ही काय कराल? दलाई लामांनी यावर उत्तर दिलं की " जर विज्ञाना ने पुनर्जन्म नाकारला तर तिबेटी बौद्ध धर्मही पुनर्जन्माच्या संकल्पने चा त्याग करेल. . . . . परंतु पुनर्जन्माला नामंजूर करणं खूप अवघड होणार आहे. "

 

इआन स्टीवेंसन ने म्हटलं आहे की ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म सोडून बाकी सर्व प्रमुख धर्माचे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. याशिवाय पाश्चिमात्य देशांतील २० ते ३० टक्के ख्रिश्चन धर्मीय पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे आहेत.