Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

प्रकरण एक ते बारा 119

पुष्कळ काळ ब्राह्मणमांनी गोमांस सोडले नाही

बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली. प्रथमत: यज्ञासाठी दीक्षा घेतलेल्याने गोमांस खाऊ नये अशी एक शक्कल निघाली.

‘‘स धेन्वै चानडुहश्च नाश्नीयात्। धेन्वनडुहौ वाऽइदं र्सव बिभुतस्ते देवा अब्रुवन् धेन्वनडूहौ वाऽइदं र्सव विभुतो हन्त यदन्येषां नयसां र्वीय तद्वेन्वनुहयोर्दधामेति.. तस्माद्धेन्वनडुहयोनश्र्नियात् तदु होवाच याज्ञवक्ल्योऽश्नाम्येवाहं मांसलं चेद्भवतीति।।’’

‘गाई आणि बैल खाऊ नयेत. गाई आणि बैल हे सर्व धारण करतात. ते देव म्हणाले, गाई आणि बैल हे सर्व धारण करतात, अतएव दुसर्‍या जातीच्या पशूचे जे वीर्य ते गाई आणि बैलामध्ये घालू या.. म्हणून गाईबैल खाऊ नयेत. पण याज्ञवल्क्य म्हणतो, शरीर मांसल होते, म्हणून मी (हे मांस) खाणारच.’ (शतपथ ब्राह्मण ३।१।२।२१).

हा वाद यज्ञसाळेपुरताच होता. कित्येकांचे म्हणणे होते की, दीक्षिताने यज्ञशाळेत प्रवेश केल्यावर गोमांस खाऊ नये. परंतु याज्ञवल्क्याला हे मत पसंत नव्हते. शरीर पुष्ट होत आहे म्हणून ते वज्र्य करण्यास तो तयार नव्हता. इतर प्रसंगी गोमांसाहार करण्यासंबंधाने ब्राह्मणांमध्ये वाद मुळीच नव्हता. इतकेच नव्हे तर कोणा तसाच प्रतिष्ठित पाहुणा आला असता मोठा बैल मऋरून त्याचा आदरसत्कार करण्याची पद्धति फार प्रसिद्ध होती. एक तेवढय़ा गौतमसूत्रकाराने गोमांसाहाराचा निषेध केला आहे. पण त्याला देखील मधुपर्कविधि पसंत असावा. ब्राह्मणांमध्ये हा विधि भवभूतीच्या कालापर्यंत तुरळक चालू होता, असे वाटते. उत्तररामचरिताच्या चौथ्या अंकाच्या आरंभी सौधातकि आणि दण्डायन यांचा संवाद आहे, त्यापैकी थोडासा भाग असा-

सौधातकि- काय वसिष्ठ!
दण्डायन- मग काय?
सौ॰- मला वाटले होते की, हा कोणी तरी वाघासारखा असावा.
द॰- काय म्हणतोस?
सौ॰- त्याने आल्याबरोबर ती आमची बिचारी कपिला कालवड झट्दिशी गट्ट करून टाकली!
द॰- मधुपर्कविधि समांस असला पाहिजे, ह्या धर्मशास्त्राच्या आज्ञेचा बहुमान करून गृहस्थ लोक श्रौत्रिय पाहुणा आला असता कालवड किंवा बैल मऋरून त्याचे मांस रांधतात. कारण धर्मसूत्रकारांनी तसाच उपदेश केला आहे.

भवभूतीचा काळ सातव्या शतकात गणला जातो. त्या काळी आजच्या सारखा गोमांसभक्षणाचा अत्यंत निषेध असता, तर वसिष्ठाने कालवड खाऊन टाकल्याचा उल्लेख त्याला आपल्या नाटकात करता आला नसता. आजला असा संवाद नाटकात घातला तर ते नाटक हिंदुसमाजाला कितीसे प्रिय होईल?

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1
**प्रस्तावना 2
**प्रस्तावना 3
**प्रस्तावना 4
**प्रस्तावना 5
**प्रस्तावना 6
**प्रस्तावना 7
प्रकरण एक ते बारा 1
प्रकरण एक ते बारा 2
प्रकरण एक ते बारा 3
प्रकरण एक ते बारा 4
प्रकरण एक ते बारा 5
प्रकरण एक ते बारा 6
प्रकरण एक ते बारा 7
प्रकरण एक ते बारा 8
प्रकरण एक ते बारा 9
प्रकरण एक ते बारा 10
प्रकरण एक ते बारा 11
प्रकरण एक ते बारा 12
प्रकरण एक ते बारा 13
प्रकरण एक ते बारा 14
प्रकरण एक ते बारा 15
प्रकरण एक ते बारा 16
प्रकरण एक ते बारा 17
प्रकरण एक ते बारा 18
प्रकरण एक ते बारा 19
प्रकरण एक ते बारा 20
प्रकरण एक ते बारा 21
प्रकरण एक ते बारा 22
प्रकरण एक ते बारा 23
प्रकरण एक ते बारा 24
प्रकरण एक ते बारा 25
प्रकरण एक ते बारा 26
प्रकरण एक ते बारा 27
प्रकरण एक ते बारा 28
प्रकरण एक ते बारा 29
प्रकरण एक ते बारा 30
प्रकरण एक ते बारा 31
प्रकरण एक ते बारा 32
प्रकरण एक ते बारा 33
प्रकरण एक ते बारा 34
प्रकरण एक ते बारा 35
प्रकरण एक ते बारा 36
प्रकरण एक ते बारा 37
प्रकरण एक ते बारा 38
प्रकरण एक ते बारा 39
प्रकरण एक ते बारा 40
प्रकरण एक ते बारा 41
प्रकरण एक ते बारा 42
प्रकरण एक ते बारा 43
प्रकरण एक ते बारा 44
प्रकरण एक ते बारा 45
प्रकरण एक ते बारा 46
प्रकरण एक ते बारा 47
प्रकरण एक ते बारा 48
प्रकरण एक ते बारा 49
प्रकरण एक ते बारा 50
प्रकरण एक ते बारा 51
प्रकरण एक ते बारा 52
प्रकरण एक ते बारा 53
प्रकरण एक ते बारा 54
प्रकरण एक ते बारा 55
प्रकरण एक ते बारा 56
प्रकरण एक ते बारा 57
प्रकरण एक ते बारा 58
प्रकरण एक ते बारा 59
प्रकरण एक ते बारा 60
प्रकरण एक ते बारा 61
प्रकरण एक ते बारा 62
प्रकरण एक ते बारा 63
प्रकरण एक ते बारा 64
प्रकरण एक ते बारा 65
प्रकरण एक ते बारा 66
प्रकरण एक ते बारा 67
प्रकरण एक ते बारा 68
प्रकरण एक ते बारा 69
प्रकरण एक ते बारा 70
प्रकरण एक ते बारा 71
प्रकरण एक ते बारा 72
प्रकरण एक ते बारा 73
प्रकरण एक ते बारा 74
प्रकरण एक ते बारा 75
प्रकरण एक ते बारा 76
प्रकरण एक ते बारा 77
प्रकरण एक ते बारा 78
प्रकरण एक ते बारा 79
प्रकरण एक ते बारा 80
प्रकरण एक ते बारा 81
प्रकरण एक ते बारा 82
प्रकरण एक ते बारा 83
प्रकरण एक ते बारा 84
प्रकरण एक ते बारा 85
प्रकरण एक ते बारा 86
प्रकरण एक ते बारा 87
प्रकरण एक ते बारा 88
प्रकरण एक ते बारा 89
प्रकरण एक ते बारा 90
प्रकरण एक ते बारा 91
प्रकरण एक ते बारा 92
प्रकरण एक ते बारा 93
प्रकरण एक ते बारा 94
प्रकरण एक ते बारा 95
प्रकरण एक ते बारा 96
प्रकरण एक ते बारा 97
प्रकरण एक ते बारा 98
प्रकरण एक ते बारा 99
प्रकरण एक ते बारा 100
प्रकरण एक ते बारा 101
प्रकरण एक ते बारा 102
प्रकरण एक ते बारा 103
प्रकरण एक ते बारा 104
प्रकरण एक ते बारा 105
प्रकरण एक ते बारा 106
प्रकरण एक ते बारा 107
प्रकरण एक ते बारा 108
प्रकरण एक ते बारा 109
प्रकरण एक ते बारा 110
प्रकरण एक ते बारा 111
प्रकरण एक ते बारा 112
प्रकरण एक ते बारा 113
प्रकरण एक ते बारा 114
प्रकरण एक ते बारा 115
प्रकरण एक ते बारा 116
प्रकरण एक ते बारा 117
प्रकरण एक ते बारा 118
प्रकरण एक ते बारा 119
प्रकरण एक ते बारा 120
प्रकरण एक ते बारा 121
प्रकरण एक ते बारा 122
प्रकरण एक ते बारा 123
प्रकरण एक ते बारा 124
प्रकरण एक ते बारा 125
प्रकरण एक ते बारा 126
प्रकरण एक ते बारा 127
प्रकरण एक ते बारा 128
प्रकरण एक ते बारा 129
प्रकरण एक ते बारा 130
प्रकरण एक ते बारा 131
*परिशिष्ट एक ते तीन 1
*परिशिष्ट एक ते तीन 2
*परिशिष्ट एक ते तीन 3
*परिशिष्ट एक ते तीन 4
*परिशिष्ट एक ते तीन 5
*परिशिष्ट एक ते तीन 6
*परिशिष्ट एक ते तीन 7
*परिशिष्ट एक ते तीन 8
*परिशिष्ट एक ते तीन 9
*परिशिष्ट एक ते तीन 10
*परिशिष्ट एक ते तीन 11
*परिशिष्ट एक ते तीन 12
*परिशिष्ट एक ते तीन 13
*परिशिष्ट एक ते तीन 14
*परिशिष्ट एक ते तीन 15
*परिशिष्ट एक ते तीन 16
*परिशिष्ट एक ते तीन 17
*परिशिष्ट एक ते तीन 18